शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

'तेरी मेहरबानियाँ...', मालकाचा जीव वाचवण्यासाठी वाघाशी भिडला, उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 14:32 IST

Dog Tiger Fight : पंचक्रोशीत कुत्र्याच्या शौर्याचे कौतुक होत आहे.

Dog Tiger Fight : तुम्हाला जॅकी श्रॉफचा 'तेरी मेहेरबनिया' हा चित्रपट आठवत असेलच. जेव्हा जेव्हा मानव आणि प्राण्याच्या मैत्री किंवा निष्ठेचा विषय येतो, तेव्हा सर्वात आधी डोळ्यासमोर हाच चित्रपट येतो. हा चित्रपट कुत्र्याच्या निष्ठेवर आधारित आहे. खऱ्या आयुष्यातही कुत्र्यासारखा निष्ठावान आणि प्रामाणिक दुसरा प्राणी नाही. मध्य प्रदेशातील एका घटनेने पुन्हा याची प्रचिती आली. 

येथील बांधवगड व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या एका गावातून धाडसी कुत्रा आणि त्याच्या मालकाच्या मैत्रीची कहाणी समोर आली आहे. उमरिया जिल्ह्यातील भरहुत गावात ही घटना घडली. एका गावात वाघ शिरला अन् गावकऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आपल्या मालकाला वाचवण्यासाठी घरातील पाळीव जर्मन शेफर्ड कुत्रा चक्क वाघाशी भिडला. कुत्र्याने आपल्या प्राणाची आहुती दिली, पण मालकाला काही होऊ दिले नाही. 

दोन दिवस उपचार अन्...मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी वाघाने राखीव क्षेत्राची हद्द ओलांडली अन् भरहुत गावाजवळ शिवम बडगय्या यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचा पाळीव कुत्रा तात्काळ मदतीला आला. कुत्र्याने सर्व शक्तीनिशी वाघाशी झुंज दिली आणि आपल्या मालकाचे प्राण वाचवले. यादरम्यान वाघाने कुत्र्याची मान जबड्याने दाबून तोडली अन् पळ काढला. घटनेनंतर शिवमने ताबडतोब कुत्र्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. 

तिथे कुत्र्यावर दोन दिवस उपचार चालले, पण शेवटी त्याचा मृत्यू झाला. शिवमने सांगितले की, हा कुत्रा गेल्या 10 वर्षांपासून त्यांच्या घरात होता. तो रोज संध्याकाळी त्याला फिरायला घेऊन जायचा. या शौर्यानंतर पंचक्रोशीतील लोक या कुत्र्याच्या शौर्य आणि निष्ठेचे कौतुक करत त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

टॅग्स :dogकुत्राTigerवाघMadhya Pradeshमध्य प्रदेश