शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्याही बाळाला जेवताना माेबाईल हवा? मग सतर्क व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 12:29 IST

सतत माेबाईलची मागणी, न दिल्यास आईबाबांना मारतात; फाेनकडे बघत जेवल्याने अन्नही अंगी लागत नाही

नवी दिल्ली : दोन वर्षांचा मोहन दूध पिण्यास आणि जेवण करायला नकार देत होता. आईने त्याच्या हातात मोबाइल दिला अन् लगेच तो खायला तयार झाला. मात्र यामुळे मोहन ६ महिन्यांमध्येच चिडचिडा झाला. तो सतत मोबाइल मागतो आणि रडत राहतो. मोबाइल न दिल्यास आई-वडिलांना मारण्याचा प्रयत्न करतो. ही बाब फक्त मोहनच्या बाबतीच नव्हे तर, अनेक लहान मुलांमध्ये आहे. रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये अशा मुलांची संख्या वाढली आहे. 

मुलांची सवय कशी मोडाल?- मुलांना टीव्ही आणि मोबाइल दाखवून खाऊ घालू नका.- जेवणासाठी मुलांना १५ ते ३० मिनिटे द्या- एकत्र बसून जेवण करा- सुरुवातीला मुलगा रागावेल, पण हळूहळू त्याची सवय बदलेल

मुलाचे समाधान होत नाहीजेवण पाहिल्यानंतर मेंदूमध्ये लहरी निर्माण होतात. न्युरॉन्समुळे तोंड, पोट आणि आतड्यांमध्ये पाचक रस, लाळ बाहेर पडते. त्यामुळे जेवण चांगले पचते. मोबाइल फोनकडे बघत खाल्ल्याने जेवणावर लक्ष केंद्रित राहत नाही. मुले जेवणावर समाधानी होत नाहीत. मूल फक्त खात राहते, त्यामुळे वजन वाढते. 

१०० पैकी ५० मुलांना मोबाइलचे व्यसन लागले होते, असे सर्वेक्षणात समाेर आले. 

मुलांच्या पचनावर परिणाम- पबमेडमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, मोबाइल फोन पाहत जेवणाऱ्यांना मुलांना आपल्याला किती भूक लागली आहे हे लक्षात येत नाही.  - तो कमी अधिक खात राहतो. त्याने काय खाल्ले हेही त्याला आठवत नाही. ते जेवण कमी चावतात. 

स्क्रिन टाईम जितका वाढेल तितका धोका जास्त वाढेल. मुलगा जे काम करत आहे ते पूर्ण लक्ष देऊन करत आहे का यावर लक्ष ठेवा. फक्त जेवणच नाही  तर दैनंदिन दिनचर्येसाठीही हा नियम लागू करा.- डॉ. मंजूषा गोयल, बालरोगतज्ज्ञ 

टॅग्स :Mobileमोबाइल