शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सूर्या पाणी पुरवठ्याच्या कामांना ‘गुपचूप’ सुरुवात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 02:37 IST

मेंढवान सोमटा येथे काम करणाºया कर्मचारी व मुकादम यांना शेतकºयांनी विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

मनोर : पालघर जिल्हातील हजारो शेतकरी व आंदोलकांच्या तोंडाला पाने पुसून मेंढवन सोमटा येथे सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामांना शासनाने सुरुवात केली आहे. काम थांबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले होते. मात्र, गुपचूप काम सुरु झाल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. या बाबत उपजिल्हाधिकारी झरे यांना विचारले असता, ‘सदर काम एमएमआरडीएचे असल्याने त्या बाबत माहती नाही. मंत्रायात चौकशी करुन सांगतो’ असे उत्तर दिले आहे.दरम्यान, मेंढवान सोमटा येथे काम करणाºया कर्मचारी व मुकादम यांना शेतकºयांनी विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी शेतकरी व त्यांच्यात हुज्जत झाली. सूर्या धरणाचे पाणी मीरा भार्इंदर , वसई-विरारला नेण्या साठी एमएमआरडीए मार्फत मुंबई अहमदाबाद महामार्ग लगत नांदगाव तर्फे मनोर, अवढाणी वाडे खडकोना परिसरात पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू केले होते. त्यास पाणी बचाव संघर्ष समिती, कष्टकरी संघटना, भूमिसेना व इतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत पालघर जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर २९ मार्च रोजी बेमुदत उपोषणाला सुरवात केली होती. त्यावर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेतकरी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिरुन ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी ४ एप्रिलपर्यंत काम थांबविण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, संघर्ष समितीच्या सदस्यांनी राज्यपाल विद्यासागर राव तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती.त्या मशिन सर्वेक्षणासाठीपाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रमाकांत पाटील म्हणाले की, एमएमआरडीएने ड्रिलिंगचे काम सुुुरु केले आहे. त्याला आमचा विरोध आहे. आमच्याशी संवाद न साधता काम सुरु केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. नानवरे यांनी सांगितले की, त्या मशनरी सर्वेक्षणासाठी आहेत. काम सुरु झालेले नाही. दरम्यान, पाणी पुरवठा योजनेचा निर्णय मुख्यमंत्र्याचे अख्त्यारीत असताना देखील पाईपलाईन सर्वेक्षण व ड्रीलिंगच्या कामाला सुरु वात झाल्याने शेतकरी व आंदोलकांमध्ये असंतोष पसरला आहे. मनसे तालुका उपाध्यक्ष जबी राऊत म्हणाले की, कोणताही निर्णय होण्या आधी हे काम सुरु झालल्याने आंदोलकांची फसवणुक झाली असून आता हे आंदोलन अधिक तिव्र करण्यात येईल.