शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे लसीचा प्रभाव कमी होतोय? केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 08:49 IST

Delta Plus Variant: देशातील कोविड साथीच्या दुसर्‍या लाटेमध्ये संक्रमित लोकांची संख्या दररोज चार लाखांच्यावर पोहोचली होती, जी गेल्या काही दिवसांत घटून ५०००० च्या आसपास गेली आहे

ठळक मुद्देजर आपण दृढ संकल्प आणि नियमांचे पालन केल्यास महामारीचा सामना करण्यासाठी आपल्याला मदत होईल. सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई – देशात कोरोना व्हायरसचं संक्रमण(Coronavirus) कमी होत असतानाच डेल्टा प्लस व्हेरिएंटनं टेन्शन वाढवलं आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या पद्धतीनं कोरोना त्याचं रुप बदलत आहे त्यामुळे महामारीच्या कोणत्या लाटेची निश्चित तारीख सांगता येत नाही असं कोविड टास्क फोर्सचे प्रमुख व्ही. के पॉल यांनी सांगितले.

व्ही. के पॉल म्हणाले की, सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे(Delta Plus Variant) लसीचा प्रभाव कमी होत असल्याचा कोणताही आकडा आमच्याकडे नाही. नियमांचे पालन आणि कोविड महामारीपासून वाचण्यासाठी प्रभावी पाऊल देशाला कोणत्याही मोठ्या संकटातून वाचण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत वैज्ञानिक आधार नाही ज्याने हा व्हायरस वेगाने संसर्ग पसरवत आहे हे सिद्ध होईल किंवा कोविड लसीचा प्रभाव कमी करत आहे. महामारीची नवी लाट अनेक गोष्टींवर निर्भर असते.

सध्याच्या महामारीत कोरोना संसर्गापासून बचाव करण्याची योग्य पद्धत ही नियमांचे कटोर पालन आणि लसीकरण धोरणांच्या दृष्टीकोनात व्यापक अनुशासनांवर अवलंबून असेल. याव्यतिरिक्त, विषाणूमध्ये होणारे बदल कोरोना आजाराची गतिशीलता बदलू शकते. महामारीची आणखी एक लाट येईल की नाही, हे आमच्या नियंत्रणाखाली नाही. माझ्या मते, लाटेसाठी कोणतीही तारीख दिली जाऊ शकत नाही. देशातील कोविड साथीच्या दुसर्‍या लाटेमध्ये संक्रमित लोकांची संख्या दररोज चार लाखांच्यावर पोहोचली होती, जी गेल्या काही दिवसांत घटून ५०००० च्या आसपास गेली आहे. देशातील अनेक राज्यांतही निर्बंध शिथिल केले जात आहेत. असंही व्ही. के पॉल यांनी सांगितले.

जर आपण दृढ संकल्प आणि नियमांचे पालन केल्यास महामारीचा सामना करण्यासाठी आपल्याला मदत होईल. सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. त्यात या व्हेरिएंटमधील बदल, व्हेरिएंटमुळे संक्रमण वेगाने पसरेल की संक्रमित रुग्णांची गंभीर होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत लसीचा प्रभाव कितपत आहे. याबद्दल सध्या काही सांगता येणं कठीण आहे. त्यामुळे वैज्ञानिकांच्या अहवालाची आणि सूचनांची वाट पाहावी लागेल असंही ते म्हणाले. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा शोध ११ जूनला लागला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस