शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिवाशी खेळ; डॉक्टरची रिसेप्शनिस्ट करायची ऑपरेशन; आतापर्यंत ९ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 10:52 IST

पोलिसांकडून दुसऱ्या डॉक्टरचा शोध सुरू

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी ग्रेटर कैलास येथून दोन डॉक्टर आणि दोन बनावट डॉक्टरांना अटक केली आहे. त्यांच्या दवाखान्यात कमी खर्चात उपचाराच्या नावाखाली लोकांच्या जिवाशी खेळले जात होते. शस्त्रक्रियेनंतर ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. यातील एमबीबीएस डॉक्टरची रिसेप्शनिस्ट पत्नी चक्क ऑपरेशन करीत होती, तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रसूतीसाठीच्या शस्त्रक्रिया करत होता. या घोटाळ्यात आतापर्यंत ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या ‘शस्त्रक्रिया घोटाळ्या’त फरिदाबादमधील आणखी एका डॉक्टरचा सहभाग असण्याची शक्यता दिल्ली पोलिस तपासत आहेत. या प्रकरणात अनेक डॉक्टरांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. गुरुवारी अग्रवाल मेडिकल सेंटर चालवणारे नीरज अग्रवाल आणि जसप्रीत सिंग (दोन्ही एमबीबीएस डॉक्टर), अग्रवाल यांची पत्नी पूजा आणि माजी प्रयोगशाळा तंत्रज्ञ महेंद्र सिंग यांना पुन्हा कोर्टात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तपासात काय समोर? अग्रवालच्या घराची आणि क्लिनिकची झडती घेतली असता स्लिप, प्रतिबंधित औषधे, सुया जप्त करण्यात आल्या. या स्लिप्समध्ये वरच्या बाजूला मोकळी जागा सोडून फक्त डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या होत्या. क्लिनिकमध्ये गर्भपात झालेल्या रुग्णांचा तपशील रजिस्टरमध्ये होता.

दुर्लक्ष महागात...२०१६ पासून दिल्ली मेडिकल कौन्सिलकडे अग्रवाल मेडिकल सेंटर, नीरज आणि पूजा अग्रवाल यांच्या विरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये कथित निष्काळजीपणामुळे रुग्णांना जीव गमवावा लागला होता. 

कोणती  ऑपरेशन केली?

बनावट डॉक्टरांनी पित्ताशयातील खडे काढण्यासाठी आणि सिझेरियन प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया केल्या. बनावट डॉक्टरांनी पित्ताशयातील खडे काढण्यासाठी आणि सिझेरियन प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया केल्या. 

टॅग्स :docterडॉक्टरdelhiदिल्लीfraudधोकेबाजी