शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

औषध कंपनीकडून गिफ्ट घेणारे डॉक्टर रडारवर, डोलो-६५०च्या शिफारसीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 10:12 IST

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा इशारा

संतोष आंधळेकोरोनाकाळात डोलो - ६५० या तापावरील गोळीची डॉक्टरांनी सर्रासपणे शिफारस केली, यात वैद्यकीय व्यावसायिकांना १ हजार कोटी रुपयांचे गिफ्ट्स कंपनीकडून दिल्याचा आरोप केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने केल्याने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने याची गंभीर दखल घेतली असून, औषध कंपनीकडून गिफ्ट घेण्याऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

या गोळीचे उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या देशातील विविध कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर या गोळीच्या शिफारसीसाठी डॉक्टरांना गिफ्ट दिल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हटले आहे. राज्यात ॲलोपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या सर्व डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला नोंदणी करून परवाना घेणे बंधनकारक असते. कौन्सिलच्या आकडेवारीनुसार राज्यात १ लाख ७१ हजार २८२ नोंदणीकृत डॉक्टर आहेत. त्यापैकी ८५ % डॉक्टर प्रॅक्टिस करतात. फार्मास्युटिकल्स कंपनीकडून त्याच्या औषध उत्पादन वाढीसाठी  कोणत्याही प्रकारचे  गिफ्ट, फॉरेन टूर्स घेणे हे नैतिकतेला धरून नसून या गोष्टीवर यापूर्वीच बंदी होती. मात्र, तरीही असे प्रकार घडत असतील आणि त्याचे पुरावे सापडले, तर कौन्सिलला डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याचे अधिकार आहेत.

अनेक औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्या विक्री वाढावी यासाठी शक्कल लढवीत असतात. यामध्ये डॉक्टरांना विक्री वाढीसाठी आमिष देणे, हा एक भाग असून यावर आधीही मोठे मंथन झाले आहे. या सर्व प्रकाराला आळा घालण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, ज्या पद्धतीने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने बंगळुरूस्थित कंपनीवर छापे टाकून डॉक्टरांना गिफ्ट दिल्याची माहिती दिल्याने पुन्हा गिफ्ट देण्याचा प्रकार चर्चेत आला आहे. सध्या डॉक्टरांसाठीचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्या साह्या करू शकतात, अशी व्यवस्था असल्याचे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले.

आपल्याकडे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या वैद्यकीय नैतिक तत्त्वे २००२ यामध्ये अशा पद्धतीने औषध उत्पादक कंपनीकडून गिफ्ट घेणे नैतिकतेला धरून नाही, असे स्पष्ट केलेले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या नवीन मसुद्यातही हे समाविष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावर सुनावणी झाली, मात्र पुराव्याशिवाय कारवाई करता येत नाही. पुरावा आढळल्यास डॉक्टरांचा परवाना रद्द करण्याचे अधिकार कौन्सिलला आहे.डॉ. शिवकुमार उत्तुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र  मेडिकल कौन्सिल

टॅग्स :doctorडॉक्टरmedicineऔषधं