शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

बदल्यांसाठी पैसे द्यावे लागले का? शिक्षकांनी उत्तर देताच मुख्यमंत्री अशोक गहलोतांची बोलतीच बंद झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 20:31 IST

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची मंगळवारी एका भाषणादरम्यान जी अवस्था झाली ते पाहून सगळेच हैराण झाले.

जयपूर -  सरकारी कामासाठी लाच द्यावी लागते त्यासाठी कामं होतं नाहीत असं म्हणतात. याचा प्रत्यय शासकीय कर्मचाऱ्यांनाही येत असतो. आपल्याला हव्या त्या ठिकाणी बदली हवी असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतात. मंत्रालयात बदल्यांचे मोठे रॅकेट असते. मात्र एखाद्या मुख्यमंत्र्यांसमोरच कुणी याचा खुलासा केला तर मुख्यमंत्र्यांची अवस्था काय होईल? याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची मंगळवारी एका भाषणादरम्यान जी अवस्था झाली ते पाहून सगळेच हैराण झाले. अशोक गहलोत यांच्या भाषणाचा छोटा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात मुख्यमंत्री शिक्षकांकडून वसुली होण्याच्या मुद्द्यावरुन समोर बसलेल्या गर्दीला विचारतात की हे खरं आहे का? त्यावर हॉलमध्ये बसलेले सर्वच हसायला लागतात आणि टाळ्यांच्या गजरात एकत्र हो म्हणून उत्तर देतात. बदली करुन घेण्यासाठी स्थानिक आमदारांच्या मागे लागावं लागतं. त्याचसोबत लाच द्यावी लागते असं शिक्षकांनी म्हटलं तेव्हा राज्याचे शिक्षणमंत्री गोविंद डोटासरा हेदेखील मंचावर उपस्थित होते.

शिक्षकांच्या या तक्रारीनंतर मुख्यमंत्री गहलोत यांची पंचाईत झाली. त्यांच्याकडे काहीच बोलायला नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांना आश्वासन देत म्हटलं की, ही खूप गंभीर बाब आहे. शिक्षकांना बदलीसाठी पैसे मोजावे लागतात. यासाठी एक धोरण बनवण्याची  गरज आहे. ज्यात शिक्षकांना २ वर्षांनी त्याची बदली कुठे आणि कधी होईल हे कळायला हवं. जेणेकरुन तेथील समस्येबाबत शिक्षकांना आधीच कल्पना असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिक्षकांनी परिस्थिती दाखवली - भाजपा

राजस्थान विधानसभेचे उपनेते राजेंद्र राठोड यांनी या व्हिडीओ क्लीपवरुन काँग्रेसवर निशाणा साधला. बदल्यांसाठी शिक्षकांना पैसे मोजावे लागतात. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासमोरच शिक्षकांनी एकाच स्वरात हा उत्तर दिलं. शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. ते कधीही खोटं बोलत नाही. आज शिक्षकांनी सरकारचा भ्रष्ट चेहरा सगळ्यांना दाखवला. काँग्रेसच्या राज्यात कुठल्याही सरकारी खात्यात बदल्यांसाठी किंवा अन्य कामासाठी लाच दिल्याशिवाय कामं होत नाहीत. एका इंटरनॅशनल रिपोर्टनुसार राजस्थानच्या ६४ टक्के जनतेने मान्य केलंय की, विना लाच सरकारमध्ये काम होऊ शकत नाही असा टोला भाजपाने लगावला आहे.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोत