शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: सरकारी पैशांचा दुरुपयोग सत्ताधारी करतात का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले लक्ष ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 07:05 IST

Narendra Modi: प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी या प्रश्नांबाबत निश्चित विचार करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केले. 

नवी दिल्ली : सत्तेतील पक्ष सरकारी पैशांचा उपयोग देशाच्या विकासासाठी करताय की आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी किंवा मग व्होट बँक बनविण्यासाठी त्यांनी याची उधळपट्टी लावलीय? प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी या प्रश्नांबाबत निश्चित विचार करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केले. 

नागरी सेवा दिनानिमित्त राजधानीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित करताना मोदी बोलत होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राष्ट्र उभारणीत आपली भूमिका वाढवण्याचे आवाहन त्यांनी  केले. तुम्ही असे न केल्यास करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी होऊन देशाची संपत्ती लुटली जाईल आणि तरुणांच्या स्वप्नांची राखरांगोळी होईल, असे ते म्हणाले. 

पैशांची उधळपट्टी होऊ नये, म्हणून सजग राहासरदार पटेल प्रशासकीय अधिकाऱ्यांना ‘स्टील फ्रेम ऑफ इंडिया’ म्हणत. तुम्हाला त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील; अन्यथा देशाची संपत्ती लुटली जाईल. करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी होईल आणि देशातील तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा होईल. पंतप्रधानांनी सांगितले की, सध्याच्या काळात त्यांची (प्रशासकीय अधिकाऱ्यांची) भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे. कारण, संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे.

काळजीपूर्वक निर्णय घ्याn मोदींनी प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कारही प्रदान केले. नागरिकांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने जिल्ह्यांनी  केलेल्या प्रयत्नांसाठी हे पुरस्कार दिले जातात.n मोदी म्हणाले की, लोकसेवकांचे छोटे-छोटे निर्णयही देशहित डोळ्यांसमोर  ठेवून घेतले गेलेले हवेत. प्रत्येक पक्षाची स्वतःची एक विचारसरणी असते व घटनेने प्रत्येक पक्षाला हा अधिकार दिला आहे. मात्र, सरकारी कर्मचारी म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. n सत्तेवरील राजकीय पक्ष करदात्यांच्या पैशाचा वापर आपल्या पक्षाच्या फायद्यासाठी करतोय की देशहितासाठी? ते कुठे वापरले जात आहेत? तुम्ही यावर बारीक लक्ष ठेवावे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारCorruptionभ्रष्टाचार