शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

बलात्कारी, दहशतवादी विमानातून प्रवास करतात मग गायकवाडांवर बंदी का? - शिवसेना

By admin | Updated: April 6, 2017 16:27 IST

शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांच्या हवाई प्रवासावरील बंदी हटवली नाही तर, एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याची धमकी शिवसेनेने दिली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 6 - शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांच्या हवाई प्रवासावरील बंदी हटवली नाही तर, एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याची धमकी शिवसेनेने दिली आहे. 10 एप्रिलपर्यंत रविंद्र गायकवाड प्रकरणात काही तोडगा निघाला नाही तर, शिवसेना एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत सांगितले. 
 
बलात्कारी, दहशतवादी, पाकिस्तानी कलाकार विमानातून प्रवास करु शकतात मग रविंद्र गायकवाडांवर का बंदी ? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. चप्पलेने मारहाण करण्यावर हत्येचा प्रयत्न असा गुन्हा कसा दाखल होऊ शकतो, एअर इंडियाच्या सीएमडीची औकात आहे का ? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. 
 
दरम्यान रविंद्र गायकवाडांवरील बंदीवरुन शिवसेनेने आज लोकसभेत जोरदार राडा केला. केंद्रीय  नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपति राजू यांच्या अंगावर शिवसेना खासदार धावून गेले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वसहमतीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आगे. मुंबईतून एअर इंडियाचे विमान उडू देणार नाही अशी धमकी शिवसेनेने दिल्यानंतर एअर इंडियाने महाराष्ट्रातील विमानतळावर सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. 
 
आणखी वाचा 
 
दरम्यान या संपूर्ण वादा प्रकरणी दोन आठवडयांनी आज रविंद्र गायकवाडांनी  संसेदत निवेदन दिले. त्यांनी या संपूर्ण घटनेसाठी एअर इंडियाच्या व्यवस्थापकाला जबाबदार धरले.  मी एअर इंडियाच्या कर्मचा-यावर पहिला हात उचलला नाही. एअर इंडियाच्या कर्मचा-याने माझी कॉलर पकडून मला ढकलले त्यावेळी मी प्रतिकार केला असा आपला बचाव करताना गायकवाड म्हणाले. 
 
तू खासदार असशील पण पंतप्रधान नाही असे मला त्या कर्मचा-याने ऐकवले. हवाई प्रवास माझा संविधानिक अधिकार आहे. हवाई कंपन्या माझा अधिकार कसा नाकारु शकतात ? असा सवाल गायकवाडांनी विचारला. माझा गुन्हा काय चौकशीशिवाय माझी मीडिया ट्रायल सुरु आहे असे गायकवाड म्हणाले.