शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरातील ‘अफस्पा’ मागे घेणे नाहीच!

By admin | Updated: April 7, 2015 23:11 IST

काश्मिरातील सीमापार दहशतवाद आणि दहशतवादी हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेता राज्यात लागू करण्यात आलेला सशस्त्र दले विशेष अधिकार कायदा

नबिन सिन्हा, नवी दिल्लीकाश्मिरातील सीमापार दहशतवाद आणि दहशतवादी हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेता राज्यात लागू करण्यात आलेला सशस्त्र दले विशेष अधिकार कायदा (अफस्पा) मागे घेतला जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथसिंग यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांना ठामपणे सांगितले.सईद यांनी नवी दिल्लीत मोदी आणि राजनाथसिंग यांची भेट घेऊन सर्वसमावेशक विकास कार्यक्रम आणि युवक व समाजाच्या अन्य घटकांच्या अन्य समस्यांवर चर्चा केली. या चर्चेत पंतप्रधानांनी युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम आणि विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर दिला. जम्मू-काश्मिरात सरकार स्थापन झाल्यानंतर सईद यांनी मोदी व राजनाथसिंग यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ होती.सईद यांनी मोदी व राजनाथसिंग यांना सौर आणि लघु व मोठे जल विद्युत प्रकल्प स्थापन करण्यासह राज्याच्या विकासासाठी तयार केलेले आपले ‘दृष्टिपत्र’ सादर केले. तसेच शहरी व ग्रामीण भागातील दळणवळण, पर्यटन विकास आणि लोकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प या मुद्यांवरही मोदींशी चर्चा केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.मुख्यमंत्री सईद यांनी मोदी आणि राजनाथसिंग यांच्या भेटीदरम्यान ‘अफस्पा’ मागे घेण्याचा मुद्दा उपस्थित केला. परंतु केंद्रीय गृहमंत्रालयाने सीमापार दहशतवाद आणि दहशतवादी हल्ल्यांच्या ताज्या घटनांच्या आकडेवारीकडे त्यांचे लक्ष वेधले व ‘अफस्पा’ मागे घेता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आल्याचे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. मागील दोन महिन्यात काश्मिरात दहशतवादी हिंसाचाराच्या ४९ घटना घडल्या, ज्यात अनेक नागरिक व सुरक्षा दलांचे जवान मारले गेले.गृह मंत्रालयाने काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही सईद यांच्यापुढे उपस्थित केला. काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन हा भाजपाचा निवडणूक मुद्दा होता. काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी लवकरच जमीन संपादन केली जाईल, असे आश्वासन सईद यांनी यावेळी दिले.