शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 17:09 IST

'भारतीय नागरिकांनी परिस्थिती सामान्य होईपर्यंत नेपाळचा प्रवास पुढे ढकलावा, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. जे लोक आधीच हिमालयीन देशात आहेत त्यांना घरातच राहण्याचा आणि रस्त्यावर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. मंत्र्यांच्या घरांची जाळपोळ करण्यात आली आहे. दरम्यान, आता निदर्शनांबाबत भारत सरकार सावध आहे. नेपाळमध्ये वाढत्या अशांततेत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. भ्रष्टाचार आणि वादग्रस्त सोशल मीडिया बंदीविरोधात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांनंतर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या निदर्शनांच्या दरम्यान, भारतीय नागरिकांनी परिस्थिती सामान्य होईपर्यंत नेपाळचा प्रवास पुढे ढकलावा, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. जे आधीच हिमालयीन देशात आहेत त्यांना घरातच राहण्याचा आणि रस्त्यावर न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले

'अधिकाऱ्यांनी काठमांडू आणि नेपाळच्या इतर अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लागू केला आहे. नेपाळमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि नेपाळी अधिकाऱ्यांच्या सूचना आणि नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मदतीची गरज असलेले भारतीय नागरिक खालील हेल्पलाइन क्रमांकांवरून दूतावासाशी संपर्क साधू शकतात, असेही  परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

९७७–९८० ८६० २८८१ (व्हॉट्सअॅपवर देखील)

९७७–९८१ ०३२ ६१३४ (व्हॉट्सअॅपवर देखील)

कालपासून नेपाळमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि अनेक तरुणांच्या जीवितहानीबद्दल आम्हाला खूप दुःख आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.  मृतांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आणि प्रार्थना आहेत. जखमींना लवकर बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे. जवळचा मित्र आणि शेजारी म्हणून, आम्हाला आशा आहे की सर्व संबंधित पक्ष संयम बाळगतील आणि शांततापूर्ण मार्गाने आणि संवादाद्वारे समस्या सोडवतील, असे या निवेदनात म्हटले आहे.  

टॅग्स :Nepalनेपाळ