शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकांच्या पोटावर पाय आणू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 07:56 IST

देशातील कोरोना स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गुरुवारी चर्चा केली.

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करताना लोकांच्या पोटावर पाय येणार नाही, याची दक्षता घ्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना सांगितले आहे. ओमायक्रॉन विषाणूमुळे रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जिथे मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला असेल, तिथे स्थानिक स्तरावर कन्टेन्मेंट करण्यात यावा, अशीही सूचना त्यांनी केली.

देशातील कोरोना स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गुरुवारी चर्चा केली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हजर होते. राज्याच्या वतीने आरोग्य मंत्र्यांची उपस्थिती  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या हालचालींवर सध्या मर्यादा आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सलग दोन- अडीच तास बसणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून राज्याच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीला उपस्थित राहतील, असे कळविले होते. पंतप्रधान कार्यालयाने त्याला मान्यता दिल्यानंतर टोपे यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत राज्यातील कोरोना स्थिती, लसीकरण, उपाययोजना व निर्बंधांबाबत माहिती दिल्याचे टोपे म्हणाले.

ओमायक्रॉनबद्दल सावध राहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ओमायक्रॉन विषाणूबद्दल असलेल्या शंकांचे हळूहळू निरसन होत आहे. कोरोना विषाणूच्या आधीच्या प्रकारांपेक्षा नवा विषाणू कित्येक पट वेगाने संसर्ग पसरवत आहे. मात्र, त्यामुळे जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. अशा स्थितीत नागरिकांनी अतिशय सतर्क राहिले पाहिजे. त्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीRajesh Topeराजेश टोपे