शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मारेकऱ्याला दया दाखवू नका, मारून टाका; मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 08:46 IST

हल्लेखोरांनी कारचे दरवाजे उघडून गोळीबार केला. चार दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर हल्ला केला.

बेंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी नव्या वादात सापडले आहेत. जेडीएसच्या एका स्थानिक नेत्याची हत्या केल्याप्रकरणी फोनवर बोलताना त्यांनी हल्लेखोराला तमा न बाळगता मारून टाका, असे आक्षेपार्ह विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, हे प्रकरण शेकणार याची कल्पना येताच त्यांनी भावनिक प्रतिक्रिया होती. असा कोणताही आदेश दिला नसल्याची सारवासारव केली आहे. 

जेडीएसचे स्थानिक नेते प्रकाश (वय 50) यांची सोमवारी हत्या करण्यात आली. त्यांची पत्नी जिल्हा पंचायतची माजी अध्यक्ष होती. प्रकाश हे कारने मद्दूरला जात होते. हल्लेखोरांनी कारचे दरवाजे उघडून गोळीबार केला. चार दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर हल्ला केला. प्रकाश यांना गंभीर हालत मध्ये मंड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. 

हे ऐकून संतप्त झालेल्या कुमारस्वामी यांनी ''प्रकाश भला माणूस होता. माहित नाही कोणी मारले. पण त्या नराधमाला दया न दाखवता ठार करा. काही समस्या नाही.'', असे फोनवर बोलताना सांगितले. 

ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी केलेल्या पत्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी हत्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर कुमारस्वामी यांनी प्रकाश हे चांगले व्यक्ती होते. पोलिसांना आवश्यक कारवाई करण्यास सांगितेल्याचे म्हटले. 

 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीMurderखूनKarnatakकर्नाटक