शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

दिल्लीत दररोज धावणार नाहीत १० लाख कार

By admin | Updated: December 13, 2015 22:28 IST

सम-विषम क्रमांकाचा फॉर्म्युला नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीपासून लागू होताच दिल्लीत सुमारे १० लाख कार दररोज रस्त्यावर उतरणार नाहीत.

नवी दिल्ली : सम-विषम क्रमांकाचा फॉर्म्युला नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीपासून लागू होताच दिल्लीत सुमारे १० लाख कार दररोज रस्त्यावर उतरणार नाहीत. प्रदूषणाच्या वाढत्या स्तराला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांचे प्रमाण जवळजवळ निम्म्याने कमी होणार आहे.दिल्लीत नोंदणीकृत सुमारे १९ लाख चारचाकी खासगी वाहने आहेत. केजरीवाल सरकारने अवलंबलेल्या धोरणानुसार सम- विषम क्रमांकाच्या वाहनांना आलटून- पालटून धावण्याला परवानगी दिली जाणार असल्याने दररोज निम्मी वाहनेच रस्त्यांवर उतरतील. दिल्लीत नोंदणी झालेल्या चारचाकी वाहनांमध्ये कार, जीप, व्हॅनचा समावेश आहे. प्रारंभी १५ दिवस प्रायोगिक स्तरावर हा आदेश राबविला जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. हिवाळ्यात राजधानीतील प्रदूषणात वाढ होत असल्याचा निष्कर्ष आयआयटी- कानपूरने अभ्यासातून काढला आहे. दिल्लीलगतच्या नोएडा, गुडगाव, गाझियाबाद, फरिदाबाद आणि सोनिपत भागात प्रवेश करणारी चारचाकी वाहने तसेच ५७ लाख बाईक आणि स्कूटरच्या संख्येवर नियंत्रण आणण्याबाबतही केजरीवाल सरकारला निर्णय घ्यावा लागेल.> वाहन उत्पादक कंपन्यांना मोठ्या नुकसानीची धास्ती1 राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) राजधानीत नव्या डिझेल वाहनांच्या नोंदणीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे वाहननिर्मात्या कंपन्यांनी मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. या आदेशामुळे आधीपासून नोंदणी झालेल्या वाहनांच्या पुरवठ्याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. 2 ज्या ग्राहकांनी डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची खरेदी करताना आधीच पूर्ण किंवा आंशिक रक्कम चुकती केली आहे. त्यांची नोंदणी आणि पुरवठ्याचे काय करायचे याबाबत सरकारने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी या कंपन्यांनी केली आहे. वर्षाच्या अखेरीस राजधानीतील शोरूममध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वाहनांना मोठी नुकसानभरपाई सोसावी लागेलसर्वसाधारणपणे डिसेंबरमध्ये कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहनांवर मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर करतात.