शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांना जनावरांप्रमाणे तुरुंगांमध्ये कोंबू नका; त्यांना मुक्त करणे योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:32 IST

देशातील १३०० तुरुंगांमध्ये क्षमतेच्या किती तरी पट अधिका कैदी ठेवण्यात आले असून, काही तुरुंगांमध्ये तर क्षमतेपेक्षा ६०० टक्के कैदी असल्याबद्दल संताप व्यक्त करीत, ‘ कैद्यांना असे जनावरांप्रमाणे तुरुंगांमध्ये डांबता येणार नाही, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे.

नवी दिल्ली : देशातील १३०० तुरुंगांमध्ये क्षमतेच्या किती तरी पट अधिका कैदी ठेवण्यात आले असून, काही तुरुंगांमध्ये तर क्षमतेपेक्षा ६०० टक्के कैदी असल्याबद्दल संताप व्यक्त करीत, ‘ कैद्यांना असे जनावरांप्रमाणे तुरुंगांमध्ये डांबता येणार नाही, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे. तुरुंगात क्षमतेहून अधिक कैदी ठेवल्याबद्दल तीव्र नाराजीही न्यायालयाने व्यक्त केली आहे.जिथे तुम्ही कैद्यांना योग्य पद्धतीने ठेवत नाही, तर मग तुरुंग सुधारणेची चर्चा करण्याला काय अर्थ आहे. कैद्यांना जनावरांप्रमाणे कोंबून ठेवण्यापेक्षा त्यांना मुक्त करणे अधिक योग्य ठरेल, असेही सांगत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांच्या व केंद्रशासित प्रदेशांच्या संबंधित राज्यांचे पोलीस महासंचालक (कारागृहे) यांना न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल नोटिसा पाठवण्याचा इशारा न्या. एन. बी. लोकूर व न्या. दीपक गुप्ता यांनी दिला. राज्य व केंद्र सरकारने यांच्या निष्काळजीपणावरही त्यांनी ताशेरे ओढले.जामीन मिळूनही आतचदेशातील अनेक कारागृहांमध्ये असे काही कैदी आहेत, की त्यांना जामीन मंजूर झाला आहे. पण त्या कैद्यांना हमी देणे शाक्य न झाल्याने त्यांची सुटका करण्यात आलेली नाही आणि किरकोळ गुन्ह्यांसाठी अटक झालेले व जामीन मिळू शकणारे कैदीही खितपत पडून आहेत, याचा उल्लेख करीत न्यायालयाने तुरुंग प्रशासनाच्या एकूणच कामकाज पद्धतीवर टीका केली.

टॅग्स :jailतुरुंग