शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आता घरात बसूनच करा देशभरातील Bus Booking, IRCTCने सुरू केली खास सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 11:37 IST

Bus Booking : IRCTCने  देशभरातील Bus Booking करण्याची सेवा सुरू केली आहे. आता पर्यटक घरात बसून देशभरातील कुठल्याही बसचे तिकीट बुक करू शकणार आहेत.

नवी दिल्ली : आयआरसीटीसीने  देशभरातील बसचे बुकिंग करण्याची सेवा सुरू केली आहे. आता पर्यटक घरात बसून देशभरातील कुठल्याही बसचे तिकीट बुक करू शकणार आहेत.

आयआरसीटीसीचे  टुरिझम पोर्टल www.bus.irctc.co.in किंवा आयआरसीटीसीचे रेल कनेक्ट ॲप यांवरून बसच्या तिकिटाचे बुकिंग करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. वास्तविक ही सेवा जानेवारी २०२१ मध्येच सुरू करण्यात आली होती. तथापि, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे त्यावर पुढे काम होऊ शकले नव्हते. आता कोरोनाची लाट ओसरल्यामुळे या प्लॅटफॉर्मवरून बसच्या बुकिंगला गती मिळण्याची शक्यता आहे. सध्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ५०  हजारांहून अधिक बस गाड्या बुकिंगसाठी उपलब्ध असतील. यात शासकीय आणि खाजगी अशा दोन्ही बसचा समावेश आहे. या सुविधेवरून २२  राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये सेवा पुरवली जाणार आहे. आयआरसीटीसीच्या ऑनलाइन बस तिकीट बुकिंगवर बँका आणि ई-वॉलेटद्वारे सूट देखील उपलब्ध असेल. 

असे होईल बस तिकीट बुक- बस तिकीट बुकिंगसाठी www.bus.irctc.co.in ला भेट द्या. तुम्हाला कुठून कुठे प्रवास करायचा आहे, ती दोन्ही ठिकाणे निर्धारित जागेमध्ये भरा. - प्रवासाची तारीख निवडा आणि सर्च वर क्लिक करा. तुम्हाला त्या मार्गावर उपलब्ध बसचे पर्याय, प्रवासाचा कालावधी, गंतव्य स्थानी पोहोचण्याची वेळ इत्यादी माहिती दिसेल. तिकिटाची किंमत आणि किती जागा बुक करायच्या बाकी आहेत, याचा तपशीलही दिसेल.

- प्रवासी सीटर, स्लीपर, एसी आणि नॉन-एसी बस निवडू शकतात. सीट निवड आणि बोर्डिंग/ड्रॉपिंग पॉईंट्स देखील निवडले जाऊ शकतात. - सीट निवडल्यानंतर ‘प्रोसिड टू बुक’वर क्लिक करा. येथे तुम्हाला लॉगिन करावे लागेल. तिकिटाची किंमत भरल्यानंतर बसचे तिकीट ऑनलाइन बुक होईल. 

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीtourismपर्यटन