शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्या आल्यासोबत जमीनही नेतात का?; शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोदींचा विरोधकांवर निशाणा

By कुणाल गवाणकर | Updated: December 25, 2020 13:52 IST

पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद

नवी दिल्ली: नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातले शेतकरी रस्त्यावर उतरले असताना, दिल्लीच्या सीमेवर महिनाभरापासून आंदोलन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी बातचीत करताना पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. स्वत:च्या राजकीय लाभासाठी विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप मोदींनी केला.प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले. यानंतर मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यातल्या मनोज नावाच्या शेतकऱ्यानं नव्या कृषी कायद्यांमुळे फायदा झाल्याचं सांगितलं. नव्या कायद्यांमुळे नवे पर्याय उपलब्ध झाले. आधी आमच्याकडे बाजारात जाऊन शेतमाल विकण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र आता आम्ही खासगी व्यापारी किंवा संस्थांना शेतमाल विकू शकतो. ते आमच्यासाठी फायदेशीर ठरतं, असं मनोज यांनी मोदींना सांगितलं.मनोज यांनी त्यांचा अनुभव सांगितल्यानंतर पंतप्रधान मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. 'काही जण त्यांची राजकीय विचारधारा शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होईल असा अपप्रचार त्यांच्याकडून सुरू आहे. मात्र आता शेतकरीच त्यांना फायदा होत असल्याचं सांगत आहेत,' अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.अरुणाचल प्रदेशमध्ये सेंद्रीय शेती करणाऱ्या गगन पेरिंग यांच्याशीदेखील मोदींनी संवाद साधला. 'मला प्रधानमंत्री किसान सम्मान निधीच्या अंतर्गत ६ हजार रुपये मिळाले. त्याचा वापर मी सेंद्रीय खतं आणि औषधं खरेदी करण्यासाठी केला. एफपीओच्या माध्यमातून माझ्यासोबत ४४६ शेतकरी जोडले गेले आहेत. तेदेखील सेंद्रीय आल्याचं उत्पादन घेतात,' असं पेरिंग यांनी सांगितलं.छोटे शेतकरी खासगी कंपन्यांसोबत जोडले गेल्यावर त्या कंपन्या तुमच्याकडून केवळ उत्पादनं घेतात की तुमची जमीनदेखील घेतात, असा सवाल मोदींनी पेरिंग यांना विचारला. त्यावर पेरिंग यांनी नुकताच आम्ही एका कंपनीसोबत करार केला. हा करार केवळ उत्पादन खरेदी करण्यासाठी आला आहे. आमच्या जमिनीसाठी नाही. आमची जमीन सुरक्षित आहे, असं उत्तर दिलं. त्यावर तुमची जमीन सुरक्षित असल्याचं तुम्ही म्हणता. पण इथे कंपन्या शेतकऱ्यांची जमीन घेतील, अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असं म्हणत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी