शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

...तर नोटाबंदीची झळ बसलेल्यांना भरपाई देऊ; 'या' पक्षाचं मतदारांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 15:09 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध

चेन्नई: तामिळनाडूत प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेल्या, मात्र सध्या विरोधी पक्षात असलेल्या द्रमुकनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी द्रमुकनं अनेक घोषणा केल्या आहेत. यातील दोन घोषणा सर्वाधिक लक्षवेधी ठरल्या आहेत. सत्तेत आल्यास माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची मुक्तता करू, नोटाबंदीतील पीडित व्यक्तींच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देऊ, अशी आश्वासनं द्रमुककडून देण्यात आली आहेत.आज द्रमुकनं जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर मोठा वाद सुरू झाला. राजीव गांधींच्या खून प्रकरणात सहभागी असलेल्यांची सुटका करू, हे द्रमुकनं दिलेलं आश्वासन वादग्रस्त ठरलं आहे. याआधीही द्रमुकनं अनेकदा राज्य सरकार आणि राज्यपालांकडे हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करण्याची मागणी केली आहे. मात्र आता थेट जाहीरनाम्यात याबद्दल आश्वासन दिल्यानं दक्षिणेतील राजकारण तापलं आहे. सत्तेत आल्यास पुद्दुचेरीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, असं आश्वासनही द्रमुकनं दिलं आहे. श्रीलंकेतून आलेल्या शरणार्थींना नागरिकत्व, मनरेगाच्या अंतर्गत 150 दिवसांमध्ये रोजगाराची हमी, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कर्ज माफ, राज्याला नीट परीक्षेतून सवलत अशी अनेक आश्वासनं द्रमुककडून देण्यात आली आहेत. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. याठिकाणी 18 एप्रिलला मतदान होईल. द्रमुक राज्यातील 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे.