शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

DLF land deals : इंधन दरवाढीच्या समस्येवरुन जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न - रॉबर्ट वाड्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 08:12 IST

DLF land deals : सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत जात आहेत.

नवी दिल्ली - सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताहेत. गुरुग्राम येथील खेडकी दौला जमीन खरेदी प्रकरणात हुड्डा आणि वाड्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूपेंद्र सिंह हुड्डा, रॉबर्ट वाड्रा यांच्याव्यतिरिक्त डीएलएफ आणि ओमकारेश्वर प्रॉपर्टीजविरोधातही गुन्हा दाखल केला गेला आहे. कलम 420, 120 बी, 467, 468, 471 या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाड्रा यांच्या स्काय लाइट हॉस्पिटॅलिटीनं गुडगावमधील सेक्टर 83, शिकोहपूर, सिंकदरपूर, खेडकी दौला आणि सिहीमध्ये 7.5 कोटी रुपयांची जमिनीच्या खरेदीचा व्यवहार केला. मात्र यानंतर याच जमिनीचा विक्री व्यवहार 55 कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 

(सोनिया गांधी, मनमोहनसिंग यांना धार्मिक ध्रुवीकरणाबाबत चिंता)

नेमके काय आहे प्रकरण?

2007मध्ये 'स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी' या नावानं  कंपनीची नोंदणी करण्यात आली होती. यानंतर 2008मध्ये या कंपनीनं ओमकारेश्वर प्रॉपर्टीजकडून साडेतीन एकर जमीन खरेदी केली, या जमिनीची किंमत साडेसात कोटी रुपये दाखवण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. 

दरम्यान, या सर्व प्रकरणावर बोलताना रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटले आहे की, ''निवडणुकांचा काळ आहे, या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ समस्येवरुन जनतेचं लक्ष भरकटवण्यासाठी जवळपास एक दशकापूर्वीचा मुद्दा उकरुन काढण्यात आला आहे. यामध्ये नवीन असे काय आहे?''.

दुसरीकडे मानेसरचे पोलीस उपायुक्त राजेश कुमार यांनी सांगितले की, ''हुड्डा, वाड्रा आणि स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएलएफ आणि इतरांविरोधात गुडगावच्या खेडकी दौला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरिंदर शर्मा नावाच्या व्यक्तीनं आमच्याकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीमध्ये जमिनीच्या खरेदी करारामध्ये अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ''

दरम्यान, लोकसभा निवडणूक 2014मध्येही भाजपानं वाड्रा यांनी केलेल्या या जमीन खरेदीचा मुद्दा उपस्थित करत त्यांना टार्गेट केले होते. 

 

टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्राSonia Gandhiसोनिया गांधी