शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१ कोटी १६ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांची दसऱ्याआधीच दिवाळी! महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ; बोनसही जाहीर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 06:26 IST

रबी पिकांच्या हमी भावातही वाढ केल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली. यामुळे महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होणार आहे. या निर्णयाचा फायदा ४८.६७ लाख कर्मचारी आणि ६७.९५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. याचवेळी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना बोनसही जाहीर केला आहे. रबी पिकांच्या हमी भावातही वाढ केल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या वर्षी मार्च आणि गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये डीए आणि डीआरमध्ये प्रत्येकी चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.

कधीपासून लागू?मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, वाढीव भत्ता १ जुलै २०२३ पासून लागू होईल. महागाई भत्त्यात ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित सूत्रानुसार आहे.

किती पडणार बोजा? महागाई भत्त्यात वाढ केल्यामुळे सरकारी खजिन्यावर वार्षिक १२ हजार ८५७ कोटींचा भार पडणार आहे.  महागाईचा सामना करण्यासाठी वर्षातून दोनदा डीए, डीआर दिला जातो.

रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनसरेल्वेच्या ११ लाख ७ हजार ३४६ अराजपत्रित कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे १ हजार ९६९ कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. रेल्वेने विक्रमी १.५० अब्ज टन मालवाहतूक आणि जवळपास ६.५ अब्ज प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या ठिकाणावर पोहोचवले आहे.

शेतकऱ्यांनाही होणार फायदासरकारने बुधवारी २०२४-२५ साठी काही रबी पिकांच्या हमी भावात वाढ केली. प्रमुख गहू उत्पादक राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने हे पाऊल उचलले. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर केंद्र सरकारने केलेली एमएसपीमधील ही सर्वात मोठी वाढ आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीरकेंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या आधीच बिगर-उत्पादकता आधारित नॉन-प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड तदर्थ बोनस जाहीर केला आहे. निमलष्करी दलांसह ग्रुप सी कर्मचारी आणि बिगर-राजपत्रित ग्रुप बी दर्जाच्या अधिकाऱ्यांना हा बोनस मिळणार आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारInflationमहागाई