शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

प्रभाग-८-गोरेवाडा-३

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

बॉक्स...

बॉक्स...
उद्यान व खेळाच्या मैदानाची वानवा
गोरेवाडा प्रभागात एकही खेळाचे मैदान नाही, त्यामुळे लहान मुलांनी कुठे खेळावे हा प्रश्न आहे. फिरायला जाता यावे, असे एकही उद्यान नाही. येथील लोकांना सकाळी किंवा सायंकाळी सेमिनरी हिल्स येथील बालोद्यानात फिरायला जावे लागते. मुलांच्या खेळण्यासाठी मैदानाची अत्यंत आवश्यकता आहे, त्यामुळे प्रभागात मोकळ्या जागेवर मैदान का निर्माण केले जात नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
बॉक्स..
बोरगाव व मंजिदाना कॉलनीत सापांची भीती

गोरेवाडा रिंगरोड ते गिट्टीखदानमधील मंजिदाना कॉलनी या दरम्यान संरक्षण विभागाची जागा आहे. झाडे लावून येथे जंगल तयार करण्यात आले आहे. जा जंगलाचा परिसर अगदी जुनी बोरगाव वस्ती आणि मंजिदाना कॉलनीला लागून आहे. त्यामुळे जंगलातील साप नेहमीच वस्तीत शिरतात. जंगलाच्या काठांनी राहणाऱ्या नागरिकांना नेहमीच सापांची भीती असते.

नागरिकांच्या प्रतिक्रिया

वस्ती वाढली, रस्ता नाही - अनिल झोडापे

गोरेवाडा वस्ती आता खूप वाढली आहे. अनेक ले-आऊट निर्माण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची संख्या वाढून वाहतूकही वाढलेली आहे. परंतु गोरेवाडा वस्तीतून जाणारा रस्ता मात्र होता तसाच आहे. वाढलेल्या ट्रिॅफकमुळे रस्ता आता कमी पडू लागला आहे. त्यामुळे वस्तीतील मुख्य रस्त्यांचेही रुंदीकरण करण्यात यावे.

पैसे दिले तेव्हाच सफाई - राजेश यादव

प्रभागात साफसफाई करणारे कर्मचारी येतात. परंतु पाहिजे तशी सफाई होत नाही. घरासमोर, दुकानासमोर पडलेला कचरा उचलला जात नाही. चहापाण्यासाठी पैसे मागितले जातात. जो पैसे देईल, त्याच्याच घरासमोरचा कचरा उचलला जातो, हा प्रकार कुठेतरी बंद झाला पाहिजे.

पथदिवे नसल्याने महिलांना भीती - हंसराज बन्सोड

गोरेवाडा येथील मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. अनेक दिवसांपासून याकडे कुणाचेच लक्ष नाही. गोरेवाडा हा भाग तसा जंगलाला लागून आहे. त्यामुळे पथदिवे नसल्याने रात्री महिलांना भीती असते. भीतीमुळे रात्री महिला बाहेरच पडत नाही. असामाजिक तत्त्व याचा फायदा घेतात. गोरेवाडा रोडवर लुटण्याचे प्रकारही त्यामुळेच वाढले आहेत.

स्मशानभूमीचा विकास व्हावा - संजय काळबांडे

गोरेवाडा येथील स्मशानभूमी ही अतिशय जुनी आहे. परंतु ती आहे तशीच आहे. या स्मशानभूमीमध्ये कुठल्याही सुविधा नसल्याने वस्ती एखाद्याचा मृत्यू झाल्यास मानकापूर घाटावर अंत्ययात्रा न्यावी लागते. त्यामुळे येथील स्मशानभूमीचा विकास तातडीने व्हावा.