शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिवे घाटाचे अवघड वळण पार ! माऊली सासवडमध्ये : आज दिंडीकर्‍यांची बैठक

By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST

बाळासाहेब बोचरेसासवड : चपापतं ऊन अन् अवघड दिवे घाट पार करत संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी संध्याकाळी सासवडमध्ये दाखल झाली. वारकर्‍यांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी सोमवारी पालखी तळावर दिंडी समाजाची बैठक होणार आहे.एकादशी असल्याने उपाशीपोटी हरिनामाचा जयघोष करीत असताना निसर्ग रविवारी वारकर्‍यांची परीक्षाच पाहत होता. शिंदे छत्री, हडपसर, उरळी देवाची अशी वाटचाल ...


बाळासाहेब बोचरे
सासवड : चपापतं ऊन अन् अवघड दिवे घाट पार करत संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी संध्याकाळी सासवडमध्ये दाखल झाली. वारकर्‍यांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी सोमवारी पालखी तळावर दिंडी समाजाची बैठक होणार आहे.
एकादशी असल्याने उपाशीपोटी हरिनामाचा जयघोष करीत असताना निसर्ग रविवारी वारकर्‍यांची परीक्षाच पाहत होता. शिंदे छत्री, हडपसर, उरळी देवाची अशी वाटचाल करीत सोहळ्याने दिवे घाटाच्या पायथ्याशी दोन तास विश्रांती घेतली आणि घाट चढण्यास प्रारंभ केला.
नाम विठोबाचे घ्यावे। मग पाऊल टाकावे।। या अभंगाप्रमाणे अवघड घाटाचे आव्हान पेलण्यासाठी नामाचे बळ वारकर्‍यांमध्ये संचारते. चढणीचा रस्ता आणि तळपते ऊन यामुळे वारकरी घामाघूम झाले. तरीही दोन तासांत हा घाट पार करून पालखी झेंडेवाडी येथे विसाव्याला आली.
२५० रुग्णांवर उपचार
वाट बिकट असल्याने अनेक वारकर्‍यांना दम लागणे, रक्तदाब वाढणे, चक्कर येणे अशा तक्रारी आल्या असून वारकर्‍यांना तातडीने रुग्णवाहिकेतून सासवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. २५० रुग्णांवर उपचार केल्याचे डॉ. परदेशी यांनी सांगितले.
--------------------------
आज सोपानकाकांचे प्रस्थान
घटकाभराच्या विश्रांतीनंतर निघालेली पालखी सायंकाळी संत सोपानकाकांच्या सासवड नगरीत दाखल झाली. संत सोपानकाकांच्या पालखीचे सोमवारी पंढरपूरसाठी प्रस्थान होणार असून तत्पूर्वी दोन्ही पालख्यांचे वारकरी एकत्र आल्याने जणू बंधूभेटच झाल्याची प्रचिती येत होती.
-------------
प्रचंड गर्दी
पुणे ते सासवड अशी मर्यादित वारी करणार्‍या पुणेकरांसाठी रविवार म्हणजे पर्वणीच होती. त्यामुळे दिवे घाटात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे पालखी सोहळा १५ मिनिटे उशिरा पोहोचला. गर्दीमुळे अनेक वाहनांच्या क्लच प्लेट उडाल्याने वाहने रस्त्यात खोळंबून राहिली.
-------------------------------