शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
2
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
3
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
4
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
5
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
6
"मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी
7
निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...'
8
उष्णतेचा कहर पण पोलिसाच्या कार्याला सलाम; बेशुद्ध झालेल्या माकडाचा वाचवला जीव
9
"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट
10
पाकिस्तानचा 'फतह २' भारतासाठी धोकादायक; अमेरिकन थिंक टँकचा इशारा, नेमकं काय आहे?
11
खरेच स्वाती मालिवाल अन् ध्रुव राठी यांच्यात फोनवरून संभाषण झाले? पाहा, व्हायरल ऑडिचे सत्य
12
कोण आहे 'ही' महिला? जिच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नतमस्तक, 'मन की बात'मध्येही उल्लेख! 
13
घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून 'डिओ'चा फवारा मारता का?; थांबा... काही सोपे उपाय करून बघा
14
Gold-Silver Rate Today : मोठ्या तेजीनंतर सोन्या-चादीच्या दरात घरसण, पाहा काय आहेत लेटेस्ट रेट
15
Top 10 Employers In India : संरक्षण मंत्रालय, रेल्वे, टीसीएस कोणत्या कंपन्या देताहेत सर्वाधिक नोकऱ्या; जाणून घ्या
16
"अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली", शेवटच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
'बिग बॉस मराठी'मधून महेश मांजरेकर या कारणामुळे पडले बाहेर, म्हणाले - "शोसाठी..."
18
NDA ला विजय मिळाला तर 9 जूनला कुठे होणार 'सेलिब्रेशन', शपथविधी? संपूर्ण प्लॅन तयार, हजारो लोक होणार सहभागी
19
T20 World Cup 2024 : India vs Pakistan सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; ISIS ची धमकी
20
"परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मालमत्तेचे विदू्रपीकरण केल्यास तीन महिने शिक्षा जिल्हाधिकारी : विधान परिषद निवडणुकीमुळे जिल्हाभरात आचारसंहिता

By admin | Published: October 21, 2016 12:17 AM

जळगाव : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यानिमित्ताने जिल्हाभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक मालमत्तांचे विद्रूपीकरण केल्यास तीन महिने शिक्षेची तरतूद असल्याचा इशारा जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिला आहे.

जळगाव : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यानिमित्ताने जिल्हाभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक मालमत्तांचे विद्रूपीकरण केल्यास तीन महिने शिक्षेची तरतूद असल्याचा इशारा जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिला आहे.
निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर रोजी विधान परिषदेच्या जळगाव मतदार संघाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या तारखेपासून संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता सुरु झाली आहे. या काळात विना परवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जे राजकीय पक्ष किंवा उमेदवारांनी खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्ता विद्रुपित केली असेल त्यांनी तत्काळ काढून टाकावे. अन्यथा या कायद्यानुसार तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन हजारांचा दंड करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिला आहे. या काळात निवडणूक पत्रकाच्या अथवा भिंत्ती पत्रकाच्या दर्शनी भागावर मुद्रकाचे नाव व पत्ता तसेच प्रकाशकाचे नाव व पत्ता तसेच एकुण छापलेली संख्या टाकावी अशी सूचना मुद्रकांना केली आहे.