शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्‘ाचा कारभार तीन डीवायएसपींच्या हाती पाच जागा रिकाम्याच : अतिरिक्त कारभाराचा ताण

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

अहमदनगर : जिल्‘ातील आठपैकी पाच पोलीस उपअधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या तीन अधिकार्‍यांवर अन्य उपविभागांचा अतिरिक्त कारभाराचा ताण पडला आहे. एका गुन्‘ाचा तपास सुरू असताना दुसरीकडे लक्ष द्यावे लागत असल्याने एकाही गुन्‘ाचा तपास तडीस नेण्यातील अधिकार्‍यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अतिरिक्त कारभाराची जबाबदारी दर दोन दिवसाला बदलली जात असल्याने अधिकारीही त्रस्त झाले आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यातील आठपैकी पाच पोलीस उपअधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या तीन अधिकार्‍यांवर अन्य उपविभागांचा अतिरिक्त कारभाराचा ताण पडला आहे. एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना दुसरीकडे लक्ष द्यावे लागत असल्याने एकाही गुन्ह्याचा तपास तडीस नेण्यातील अधिकार्‍यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अतिरिक्त कारभाराची जबाबदारी दर दोन दिवसाला बदलली जात असल्याने अधिकारीही त्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यात पोलीस दलाचे आठ उपविभाग आहेत. संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, अहमदनगर, अहमदनगर ग्रामीण, पोलीस मुख्यालय उपविभाग, शेवगाव, कर्जत अशा आठ उपविभागांचा समावेश आहे. सध्या नगर शहराचे पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील, कर्जतचे उपअधीक्षक धीरज पाटील आणि श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक राकेश ओला हे तीनच अधिकारी कार्यरत आहेत. शिर्डी येथील उपअधीक्षक विवेक पाटील यांची पदोन्नती झाल्याने त्यांना तेथून कार्यमुक्त करण्यात आले आहे. तेथे अद्याप नव्या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. शेवगाव येथील उपअधीक्षक संजय पाटील हे गेल्या महिनाभरापासून रजेवर आहेत. त्यांच्याकडे जवखेडा येथील दलित हत्याकांडाचा तपास देण्यात आला होता. मात्र ते आजारी पडल्याने ते रजेवर गेले आहेत. त्यांचा अतिरिक्त पदभार वाय.डी. पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. कधी त्यांच्याकडे शेवगाव, तर कधी नगर ग्रामीण भागाचा पदभार देण्यात येत असल्याने कोणत्या भागावर लक्ष केंद्रीत करावे, याबाबत त्यांचीही द्विधा मनस्थिती झाली आहे.
नगर ग्रामीण आणि पोलीस मुख्यालयाच्या उपअधीक्षक अशा दोन्ही ठिकाणी अनिता जमादार या काम पाहत होत्या. त्या सहा महिन्यांच्या रजेवर आहेत. त्यांचा पदभारही पाटील यांच्याकडे आहे. पोलीस मुख्यालयाचे उपअधीक्षक म्हणून पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संगमनेर उपविभागाच्या उपअधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवरही उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी अद्याप नियुक्त केला नसल्याने श्रीरामपूरचे ओला यांच्याकडेच संगमनेरचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
--------