शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त न्या. सी. एस. कर्णन यांचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: June 21, 2017 12:08 IST

सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन अवमानाबद्दल शिक्षा ठोठावलेले कोलकाता उच्च न्यायालयाचे वादग्रस्त माजी न्यायाधीश सी. एस. कर्णन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 -  सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन अवमानाबद्दल शिक्षा ठोठावलेले कोलकाता उच्च न्यायालयाचे वादग्रस्त माजी न्यायाधीश सी. एस. कर्णन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे.  
न्यायाधीश सी. एस. कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयाने  न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या सुनावणीनंतर न्यायाधीश सी. एस. कर्णन गेल्या काही दिवसांपासून फरार होते. मात्र, त्यांना मंगळवारी (दि.21) कोलकाता पोलिसांनी कोयम्बतूर येथून अटक केली.  दरम्यान, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत जामीन मिळावा आणि ठोठावण्यात आलेली शिक्षा रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. 
न्यायाधीश सी. एस. कर्णन 12 जून रोजी फरार अवस्थेत सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्याने पदावरील न्यायाधीशांच्या अटकेने होणारी न्यायव्यवस्थेची नामुष्की टळली. चेन्नई उच्च न्यायालयात असताना न्यायाधीश सी. एस. कर्णन  यांनी त्याठिकाणी अनेक वाद निर्माण केल्याने त्यांची कोलकत्याला न्यायालयात बदली करण्यात आली होती. मात्र, त्याठिकाणी सुद्धा त्यांनी वादग्रस्त उक्ती व कृतीचा सपाटा सुरु ठेवल्याने सर्वोच्च न्यायालयाने अखेर त्यांच्यावर कन्टेप्ट ऑफ कोर्टचा बडगा उगारून सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. 
सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहार यांच्या नेतृत्वाखालील सात न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठाने न्यायाधीश सी. एस. कर्णन यांना शिक्षा ठोठावताना दोन पानी आदेशात्मक निकाल दिला होता व सविस्तर निकालपत्र नंतर देण्याचे नमूद केले होते.