शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंधन करावरून वाद पेटला; केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 10:23 IST

विरोधकांचा हल्लाबोल, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पेट्राेल आणि डिझेलवर व्हॅट कमी न करणाऱ्या राज्यांवर नाराजी व्यक्त केली हाेती.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : पेट्राेल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि विराेधकांमध्ये जुंपली आहे. केंद्रीय पेट्राेलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी गुरुवारी महाराष्ट्रासह इतर राज्यांसंदर्भात ट्विट करून बिगर भाजपशासित राज्यांना लक्ष्य केले. त्यावरुन विराेधकांनी माेदी सरकारवर हल्लाबाेल केला. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पुरी यांना प्रत्युत्तर देऊन राज्यांच्या ७८ हजार काेटींच्या थकबाकीकडे लक्ष वेधले. तर अनेकांनी पेट्राेल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी करून हा वाद मिटविण्याचा सल्ला दिला.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पेट्राेल आणि डिझेलवर व्हॅट कमी न करणाऱ्या राज्यांवर नाराजी व्यक्त केली हाेती. त्यानंतर हरदीपसिंह पुरी यांनी व्हॅटबाबत ट्विटची मालिकाच पाेस्ट केली. या मुद्द्यावरुन विराेधकांनी जाेरदार प्रत्युत्तर दिले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी व्हॅटमध्ये कपात करण्यास नकार देताना केंद्राचे उत्पादन शुल्क २०१४च्या पातळीवर आणण्याचा सल्ला दिला. तामिळनाडूने गेल्या वर्षी व्हॅटमध्ये ३ रुपयांची कपात केल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. 

हरदीप पुरींचे ट्विटपुरी यांनी सर्वप्रथम महाराष्ट्राबाबत ट्वीट करुन सांगितले, की राज्याने २०१८पासून ७९ हजार ४१२ काेटी रुपये इंधनावरील करांपाेटी प्राप्त केले. यावर्षीही ३३ हजार काेटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. तरीही त्यांनी व्हॅट कमी केला नाही. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये हरयाणा आणि राजस्थानमधील व्हॅटची तुलना केली.  तर आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी तेलंगणामध्ये पेट्राेल आणि डिझेलवर ३५ टक्के व्हॅट आकारण्यात येत असल्याकडे लक्ष वेधले.

त्यांचा संघराज्यवाद सहकारी नव्हे, तर सक्तीचाइंधन दरवाढीबाबत राज्यांवर ठपका ठेवा. कोळसाटंचाईबाबत राज्यांना दोष द्या. ऑक्सिजन कमतरतेबाबतही राज्यांवर दोषारोप करा. इंधनावरील करापैकी ६८ टक्के हिस्सा केंद्र सरकार घेते, असे असताना पंतप्रधान जबाबदारी झटकत आहेत. मोदी यांचा संघराज्यवाद सहकारी नाही. तो सक्तीचा आहे. - राहुल गांधी, काँग्रेस नेते

टॅग्स :Petrolपेट्रोल