नांदूर नाका परिसरात विजेअभावी नागरिकांची गैरसोय
By admin | Updated: June 1, 2014 00:32 IST
नांदूर नाका : गेल्या सहा दिवसांपासून नांदूर नाका परिसरात वीज नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
नांदूर नाका परिसरात विजेअभावी नागरिकांची गैरसोय
नांदूर नाका : गेल्या सहा दिवसांपासून नांदूर नाका परिसरात वीज नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.नांदूर नाका शिव रस्त्यावरील मटाले मळा, गोसावी, दिंडे, बोराडे मळा या भागात वीज नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे वीजतारा तुटल्यामुळे वीजप्रवाह खंडित झाला आहे. खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. यासाठी वीज मंडळ कार्यालयात तक्रार केली; परंतु अधिकार्यांनी अद्याप दखल घेतलेली नाही. वादळी वार्यामुळे पडलेले खांब व वीजवाहक तारा रस्त्यावर पडलेल्या आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. वीज नसल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. जनावरांना व शेतीला पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नाही. यामुळे कामे ठप्प झाली आहेत. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी सुधाकर चव्हाण, गोकुळ मटाले, दत्ता निमसे, अरुण दिंडे आदिंनी केली आहे.