नवी दिल्ली : पेट्रोलप्रमाणोच डिङोलचे दरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेताच डिङोल स्वस्त झाले. केंद्राने नियंत्रण उठविताच डिङोलच्या किमतीमध्ये प्रतिलीटर 3 रुपये 37 पैशांच्या कपातीचा निर्णय जाहीर झाला. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. यात स्थानिक कर अथवा व्हॅटचा समावेश नसल्याने प्रत्यक्षातील कपात प्रतिलीटर चार रुपयांर्पयत असेल.
पाच वर्षात प्रथमच डिङोलच्या किमतीत कपात झाली असून, यापुढे हे दर थेट बाजारातील चढ-उतारानुसार ठरतील व सरकारी तिजोरीवरही अनुदानाचा बोजा पडणार नाही. आजमितीस आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उतरलेल्या असल्याने त्याचा लाभ ग्राहकांना होणार असला, तरी यापुढे सबसिडीचा संबंध राहणार नसल्याने भविष्यात कच्चे तेल महागले, तर वाढीव किमतीचा बोजा सोसण्याची तयारी लोकांना ठेवावी लागणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी येथे पत्रकार परिषदेद्वारे डिङोलचे दर नियंत्रणमुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला. जून 2क्1क् मध्ये पेट्रोलचे दर सरकारी नियंत्रणातून मुक्त केल्यानंतर डिङोलचे दरही नियंत्रण मुक्त करण्याची मागणी जोर धरीत होती. विशेषत: आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्यानंतर आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यानंतर सरकारी तिजोरीवर बोजा वाढत असल्यामुळे ही मागणी होत होती. त्यामुळे जानेवारी 2क्12 मध्ये डिङोलचे दर प्रतिमहिना 5क् पैशांनी वाढविण्याचा निर्णय घेत गेल्या दीड वर्षात सरकारने हा तोटा भरून काढला. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात किमती प्रतिबॅरल 83 डॉलर्पयत कमी झाल्याच्या पाश्र्वभूमीवर डिङोलच्या किमती कमी करण्याची मागणी होती. (वृत्तसंस्था)
गॅसचे अनुदान बँकेत
एलपीजी अर्थात घरगुती गॅसचे अनुदान
आता थेट कॅश ट्रान्स्फरच्या माध्यमातून
जमा करण्याची घोषणा जेटली यांनी केली. आधार कार्डाच्या माध्यमातून हे
पैसे ग्राहकांच्या खात्यात जमा होणार असून, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अथवा बँक खाते नाही, त्यांच्यासाठी जुन्या पद्धतीनेच
गॅस वितरण व अनुदान पद्धती सुरू राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
अमेरिकी डॉलर प्रति युनिट नैसर्गिक गॅसच्या किमतीत वाढ करण्याच निर्णय सरकारने जाहीर केला आहे.
यामुळे सीएनजी, घरगुती सीएनजी गॅस, खते, वीज अशा विविध गोष्टींच्या किमतीत वाढ होणो अपरिहार्य आहे.