नवी दिल्लीः 50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार असून, पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. गरज पडल्यास त्यांना देशाबाहेरही हाकलून देणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये 24 परगना जिल्ह्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. सर्वात आधी त्यांचं नाव मतदारयादीतून काढून टाकण्यात येणार आहे. त्यानंतर ममतादीदींना मतांचं ध्रुवीकरण करता येणार नाही. एकदा असं झाल्यास ममतादीदींची मतं आपोआपच कमी होतील आणि येत्या निवडणुकीत आम्ही 200 जागा जिंकू, असा विश्वास घोष यांनी व्यक्त केला आहे. ममतादीदींच्या पक्षाला 50 जागासुद्धा जिंकता येणार नाहीत.तत्पूर्वी घोष यांनी 12 जानेवारीलासुद्धा असंच एक वादग्रस्त विधान केलं होतं. सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणाऱ्या लोकांना भाजपाशासित राज्य उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटकात गोळ्या घातल्या पाहिजेत. राज्यात एक कोटी घुसखोर आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात हिंसक प्रदर्शन करत 500 ते 600 कोटी रुपयांचं सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं आहे. ती काय त्यांच्या वडिलांची संपत्ती आहे काय?, ते सरकारच्या संपत्तीला कशा प्रकारे नुकसान पोहोचवू शकतात. जी करदात्यांच्या पैशातून तयार झाली आहे.
''50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार; पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणार''
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 09:46 IST
50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार असून, पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे.
''50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार; पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणार''
ठळक मुद्दे50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार असून, पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणारगरज पडल्यास त्यांना देशाबाहेरही हाकलून देणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.सर्वात आधी त्यांचं नाव मतदारयादीतून काढून टाकण्यात येणार आहे.