ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - महागाईने त्रस्त झालेल्या जनतेसाठी खुशखबर.. दिवाळीपूर्वी डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. डिझेलच्या दरात तब्बल साडेतीन रुपयांची कपात होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार,आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने सध्या तेल कंपन्यांना डिझेल विक्रीवर फायदा होत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी डिझेलचे भाव कमी होऊ शकतात. तब्बल पाच वर्षांनी डिझेलचे भाव कमी होणार असून जनतेलाही दिलासा मिळेल.
दरम्यान पेट्रोलचे भाव नुकतेच एक रुपयाने कमी करण्यात आले होते.