शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयू कॅम्पसमधील सुरक्षा व्यवस्था बिघडली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 04:46 IST

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) विद्यार्थ्यांच्या गटांत हाणामाऱ्या झाल्यानंतर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्थेच्या मोठ्या घोषणा होतात.

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) विद्यार्थ्यांच्या गटांत हाणामाऱ्या झाल्यानंतर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्थेच्या मोठ्या घोषणा होतात. जेएनयु परिसरात नऊ फेब्रुवारी, २०१६ रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता ‘भारत तेरे टुकड़े होंगे, ‘अफजल हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं।’ अशा देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. संपूर्ण देशात ही चर्चा झाली की, जेएनयुत देशविरोधात कारवाया का होतात? त्यांच्यावर नजर का ठेवली जात नाही? या वादात विद्यार्थी संघटनेचा तत्कालीन अध्यक्ष कन्हैया कुमार याची बरीच चर्चा झाली. विद्यापीठ परिसरात त्या रात्री अभाविप व डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांत बरीच मारामारी झाली.कन्हैया कुमार प्रकरणापासून ते चेहरे झाकलेल्या गुडांनी केलेले हल्ले यात जेएनयुत काय बदल झाला? कन्हैया प्रकरणानंतर जेएनयु प्रशासनाने दिल्ली उच्च न्यायालयात मे २०१७ मध्ये एक शपथपत्र दाखल करून आम्ही कॅम्पसमध्ये सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी ६०० सीसीसीटीवी कॅमेरे बसवू, असे म्हटले होते. प्रत्यक्षात १०० देखील कॅमेरे लागलेले नाहीत.बहुतेक हाणामाºया विद्यापीठाच्या वसतिगृहांत होतात. विद्यापीठाच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाºयाने ‘लोकमत’ ला सांगितले की, सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास आमचा खासगीपणा राहणार नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार होती. न्यायालयाचेही म्हणणे होते की, परिसरात कॅमेरे लावताना विद्यार्थ्यांचा खासगीपणा सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. यात हे ठरले की, शाखा आणि अभ्यास केंद्रात सीसीसीटी कॅमेरे लावले जावेत. शाळेबाहेर सीसीसीटीव्ही कॅमेरे लावलेही गेले होते. परंतु, विद्यार्थ्यांनी ते फोडून टाकले होते.

टॅग्स :jnu attackजेएनयू