शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वीटभट्टीत सापडला १.२० कोटी रुपयांचा हिरा; एवढा मोठा हिरा सापडण्याची पहिली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 11:12 IST

२६.११ कॅरेटचा आहे हा हिरा. दोन दिवसांत लिलाव करणार.

पन्ना (मध्यप्रदेश) : विटांच्या छोट्या भट्टीवर काम करणाऱ्याला २६.११ कॅरेटचा हिरा सापडला असून, लिलावात त्याची किंमत १.२० कोटी रुपये येऊ शकेल, असे पन्नाचे हिरा अधिकारी रवी पटेल मंगळवारी म्हणाले. हा हिरा पन्ना जिल्ह्यातील एका उथळ खाणीत सापडला. 

दाेन दिवसांत लिलावपन्ना गावात किशोरगंजचे रहिवासी सुशील शुक्ला आणि त्यांच्या भागीदारांना सोमवारी कृष्णा कल्याणपूर भागाजवळच्या खाणीत हा हिरा सापडला. येत्या एक दोन दिवसांत हिरा लिलावासाठी ठेवण्यात येईल. सरकारचे स्वामित्वधन (रॉयल्टी) आणि कर वळते करून घेऊन खाण कामगाराला पैसे दिले जातील, असेही पटेल म्हणाले.

१२ कॅरेटच्या हिऱ्यांचे भांडार राजधानी भोपाळपासून पन्ना जिल्हा ३८० किलोमीटर असून, तेथे अंदाजे १२ कॅरेटसच्या हिऱ्यांचे भांडार असल्याचा अंदाज आहे. 

एवढा मोठा हिरा सापडण्याची पहिलीच वेळ 

  • छोट्या स्वरुपात वीटभट्टी भाड्याने चालवण्याचा व्यवसाय करणारे सुशील शुक्ला म्हणाले, “मी, माझे कुटुंब गेल्या २० वर्षांपासून हिरा खाण कामात असलो तरी, एवढा मोठा हिरा सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. 
  • जेथे हिरा सापडला ती खाण उथळ आहे. ती मी इतर पाच भागीदारांसोबत भाड्याने घेतली आहे.” या हिऱ्याला १.२० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल, अशी आशा शुक्ला यांनी व्यक्त केली. हिऱ्याच्या लिलावातून आलेला पैसा मी व्यवसायात लावेन.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश