शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

धरणगावचा धरणीनाला बनला दुर्गंधीयुक्त

By admin | Updated: March 28, 2015 01:43 IST

धरणी चौकातून जातो धरणीनाला

धरणी चौकातून जातो धरणीनाला
वाहते पाण्याचा अभावाने दुर्गंधीचे वातावरण
परिसरातील नागरिक करतात कचरा-घाण टाकण्यासाठी नाल्याचा उपयोग
परिसरात दुर्गंधीचे घाणीचे साम्राज्य
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
धरणगाव शहर दाट वस्तीचे शहर म्हणून ओळखले जाते. यातील अनेक चौकापैकी धरणी चौक हा गजबजलेला चौक म्हणून प्रसिद्ध आहे. या चौकात नेहमी गर्दी व वर्दळ असते. यातूनच एक मोठा नाला गेलेला आहे यास धरणी नाला असे म्हणतात. अर्ध्या शहराचे सांडपाणी या नाल्यामध्ये उतरविले आहे. सुमारे १ ते १।। कि.मी. चा हा नाला मोहल्ला गल्ली, धरणी चौक, मोठा माळीवाडा, मोची वाडा या मार्गाने गेलेला आहे. या नाल्यात वाहते पाणी कमी तर घाण कचरा जास्त प्रमाणावर असल्याने दुर्गंधीयुक्त नाला म्हणून याची ओळख आहे.
या नाल्यात या परिसरातील नागरिक नेहमी टाकाऊ पदार्थ, केरकचरा, खराब भाजीपाला टाकत असतात. त्यामुळे दुर्गंधी पसरलेली असते. येता-जाताना तर तोंडावर रूमाल ठेवूनच जावे लागत असल्याने या परिसरात राहणार्‍या नागरिकांचे काय? असा प्रश्न निर्माण होतो.
अपघातग्रस्त नाला
शहरातील धरणीनाला हा उघडा व खोलगट आहे. नाल्याच्या दोन्ही बाजूला रहदारीचा रस्ता आहे. परंतु रात्रीच्यावेळी या परिसरात काही भागात अंधार असल्याने अधून -मधून सायकलस्वार, पायदळ चालणारे नागरिक, लहान मुले नाल्यात पडत असल्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे अपघातग्रस्त नाला म्हणून याची ओळख आहे. सध्या डेंग्यू रोगाची लागण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात धरणी नाल्याचा परिसरातील घाण व दुर्गंधीमुळे डास व मच्छरांचे वास्तव्य वाढलेले दिसून येत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने याबाबत दखल घेणे जरुरीचे आहे. तसेच या परिसरातील नागरिकांनी या नाल्यात घाण, टाकाऊ पदार्थ, केरकचरा टाकण्यावर निर्बंध करावा व आपला परिसरत स्वच्छ ठेवावा हे तितकेच महत्त्वाचे आहे. (वार्ताहर)