शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील एकमेव मंदिर, इथे भाविक देवाकडे करतात मृत्यूची मागणी, अशी आहे आख्यायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 11:54 IST

Madhya Pradesh News: सर्वसाधारणपणे भाविक मंदिरात येऊन देवासमोर आपली विविध गाऱ्हाणी मांडत असतात. आजारपणाच्या प्रसंगी व्याधीतून मुक्तता मिळून दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, असं मागणं देवाकडे मांडतात. मात्र विविधतेने भरलेल्या आपल्या देशात असंही एक मंदिर (Dharmraj Chitragupta Mandir) आहे जिथे भाविक दीर्घायुष्य नाही तर मृत्यूची मागणी करण्यासाठी येतात.

सर्वसाधारणपणे भाविक मंदिरात येऊन देवासमोर आपली विविध गाऱ्हाणी मांडत असतात. आजारपणाच्या प्रसंगी व्याधीतून मुक्तता मिळून दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, असं मागणं देवाकडे मांडतात. मात्र विविधतेने भरलेल्या आपल्या देशात असंही एक मंदिर आहे जिथे भाविक दीर्घायुष्य नाही तर मृत्यूची मागणी करण्यासाठी येतात. हे मंदिर मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे आहे. धर्मराज आणि चित्रगुप्त मंदिर असं या मंदिराचं नाव असून, येथे भाविक मृत्यूची मागणी करण्यासाठी येतात.

मध्य प्रदेशमधील उज्जैन शहराचं धार्मिक महत्त्व मोठं आहे. येथील वातावरणात शिवशंकराचा वास आहे, असं मानलं जातं. उज्जैनमध्ये अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांचं आगळंवेगळं महत्त्व आहे. त्यापैकीच हे धर्मराज आणि चित्रगुप्त मंदिर आहे. येथे भाविक मृत्यूची मागणी करण्यासाठी येतात. येथे संबंधित व्यक्तीच्या नावाने दिवा पेटवावा लागतो. त्यानंतर २४ तासांच्या आत व्यक्ती मोक्षप्राप्ती करते, अशी आस्था आहे.

हे मंदिर शिप्रा नदीवरील रामघाट येथे आहे. धर्मराज आणि चित्रगुप्त मंदिर असं नाव असलेल्या या मंदिरामध्ये धर्मराज आणि चित्रगुप्त या दोन्ही देवता विराजमान आहेत. येथे दररोज शेकडो भाविक आपलं मागणं मागण्यासाठी येतात.  या मंदिरात पूजाविधी केल्यानंतर अनेक लोकांची प्रकृती सुधारल्याचे सांगण्यात येते. येथे लावलेला तुपाचा दिवा धर्मराज आणि चित्रगुप्त यांना प्रसन्न करतो, अशी श्रद्धा.

या मंदिराबाबत अधिक माहिती देताना जाणकारांनी सांगितले की, ज्या व्यक्तीला शारीरिक त्रास होत आहे, अशी व्यक्ती प्रकृतीच्या स्वास्थ्यासाठी किंवा मोक्ष मिळावा यासाठी येथे येऊन तुपाचा दिवा लावते. असे केल्याने त्रास दूर होतो आणि मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे येथे हजारो भाविक येथे येतात. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशAdhyatmikआध्यात्मिक