शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विमानांमध्ये हिंदी वर्तमानपत्र आणि मासिकं ठेवणं सक्तीचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 15:40 IST

विमानात हिंदी भाषेतील वाचन साहित्य न उपलब्ध  करून देणे, हे अधिकृत भाषेसाठी तयार करण्यात आलेल्या सरकारी धोरणाचे उल्लंघन ठरेल

नवी दिल्ली, दि. 26 - विमान कंपन्यांना विमानांमध्ये इंग्रजी भाषेसोबत हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिके उपलब्ध करून देणे सक्तीचे झाले आहे. नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने(डीजीसीए) सर्व विमान कंपन्यांना प्रवाशांसाठी हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिके उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांना  हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिके उपलब्ध होतायेत की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी डीजीसीएने सर्व विमानकंपन्यांना नोटीस जारी केली आहे. 

विमानात हिंदी भाषेतील वाचन साहित्य न उपलब्ध  करून देणे, हे अधिकृत भाषेसाठी तयार करण्यात आलेल्या सरकारी धोरणाचे उल्लंघन ठरेल, डीजीसीएचे सह महासंचालक ललित गुप्ता यांनी सर्व विमान कंपन्यांना याबाबत एक पत्र पाठवलं आहे.दूसरीकडे डीजीसीएच्या या आदेशानंतर कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ट्विटरद्वारे खोचक टीका केली आहे. 'आता भारतीय विमानात  हिंदी मासिकंही वाचायला देण्याचा डीजीसीएचा विचार आहे...(शाकाहारी जेवणासोबत)' असं ट्विट त्यांनी केलं.  काही दिवसांपूर्वी भारतीय विमानकंपनी एअर इंडियाने  खर्चावर कात्री लावण्याच्या उद्देशाने देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान इकॉनॉमी क्लासमध्ये नॉन व्हेज पदार्थ न देण्याचा निर्णय घेतला होता. 

याशिवाय, डीजीसीएच्या एका माजी अधिकाऱ्यानेही या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. हा निर्णय पूर्णपणे निरर्थक आहे. डीजीसीए ही सुरक्षा नियामक संस्था आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या निर्णयांशी त्यांचे काहीही देणेघेणे नाही.   

एअर इंडियाचे खासगीकरण पक्के-

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा तोटा असलेल्या एअर इंडियाचे खासगीकरण करण्यास केंद्राने बुधवारी तत्त्वत: मान्यता दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. निति आयोगाने खासगीकरणाची शिफारस केल्यानंतर जेटली व नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी तसे संकेत दिले होते. विमान व्यवसायातील व अन्य कंपन्याही खासगीकरणाच्या प्रक्रियेत स्पर्धा करू शकतील, असे नूद करून जेटली म्हणाले की, भारतात ५00 ते ६00 तर चीनमध्ये ५ हजार विमाने आहेत. भारतात विमान वाहतुकीला मोठी संधी आहे.याआधी एअर इंडियाला ३0 हजार कोटी रुपये देण्यात आले. तरीही तिचे कर्ज व तोटा वाढत आहे. कंपनीचे २२ हजार कोटींचे कर्ज माफ झाल्यास आणि काही मालमत्ता विकल्यास एअर इंडियावरील बोजा कमी वा संपण्यास मदत होईल. सरकार तोट्याचे काय करणार?एअर इंडियाचे खासगीकरण कशा प्रकारे करायचे, हे सरकारने अद्याप ठरविलेले नाही. तसेच एअर इंडियाचा सध्याचा तोटा सरकार भरून काढणार किंवा कसे, हेही निश्चित झालेले नाही. एअर इंडियावर कर्जाचा बोजा असून, त्याची पुनर्रचना करण्यासाठी बँकांशी बोलणीही सुरू आहेत. त्यामुळे ती प्रक्रियाही पूर्ण व्हावी लागेल. एअर इंडिया ही कंपनी पूर्णपणे विक्रीत काढायची की त्यात केंद्र सरकारचा काही हिस्सा ठेवायचा, हेही अद्याप नक्की झालेले नाही.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव घसरल्यामुळे आणि प्रवासी संख्येत वाढ झाल्याने फक्त २0१५-१६ मध्येच कंपनीला 105 कोटींचा नफा झाला होता.एअर इंडियाने प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण एकूण संख्येच्या 15 टक्क्यांच्या आसपास आहे.