शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

मी अंत्यविधीचं सामान विकतो, त्यामुळेच घर चालतं, पण...; ज्येष्ठानं मोदींना लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 11:30 IST

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृतांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरून अंत्यविधीचं सामान विकणाऱ्या एका व्यक्तीनं मोदींना पत्र लिहिलं आहे.

देवास: गेल्या महिन्याभरापासून देशातल्या कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. गेल्या वर्षात कोरोनाची पहिला लाट आली होती. त्यावेळी दिवसभरात कधीही १ लाखापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले नव्हते. मात्र गेल्या सहा दिवसांपासून देशात दररोज १ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मृतांचा आकडादेखील झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे. यासंदर्भात अंत्यविधीचं सामान विकणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. याआधी कधीही एकाचवेळी इतके मृत्यू पाहिले नसल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.सर्दी खोकला नसेल तरीही वेळीच सावध व्हा'; समोर आली कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची गंभीर लक्षणंमध्य प्रदेशातल्या देवास जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या लीलाधर व्यास यांनी पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनादेखील पत्र लिहिलं आहे. कोरोनामुळे वाढलेल्या मृत्यूच्या प्रमाणाबद्दल व्यास यांनी चिंता व्यक्त केली आहे. 'मी लीलाधार व्यास. देवासमध्ये अंत्यविधीचं सामान विकण्याचा व्यवसाय करतो. गेल्या कित्येक दिवसांपासून मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. आधी दिवसाला एक ते दोन जणांचा मृत्यू व्हायचा. पण आता दिवसाला सरासरी १२ ते १५ जणांचा मृत्यू होतोय. अंत्यविधीच्या सामानाच्या दुकानामुळे माझी उपजीविका चालते. मात्र मृत्यूचं वाढलेलं प्रमाण चिंताजनक आहे. मृतांमध्ये वृद्ध, तरुण, लहान मुलं अशा सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे,' असं व्यास त्यांच्या पत्रात म्हणतात.कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी काढला पळ; २ दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्येच पडून राहिलामृतांच्या यादीत कदाचित माझंही नाव येईलकोरोनामुळे मृत पावणाऱ्यांच्या यादीत कदाचित माझं किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांचं नाव येईल, अशी भीती व्यास यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षीप्रमाणे देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अनेक शहरं कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. कोरोना रुग्णांवरील उपचारार्थ वापरली जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा असल्यानं त्यांची चढ्या दरानं विक्री होत असल्याचं मी ऐकलं आहे. गरीब व्यक्ती हे महागडं इंजेक्शन कसं खरेदी करणार? हे इंजेक्शन विकत घेणं त्याच्यासाठी अतिशय अवघड आहे साहेब, असं व्यास यांनी पत्रात म्हटलं आहे.माणसं मरुन पडतील तेव्हा जाग येणार का...?, काहींची बेफिकिरी आणि काहींची मजबुरी...ज्यांनी आपली माणसं गमावली, त्यांना आयुष्याची किंमत माहित्येयऔषधं आणि इंजेक्शन महाग असल्यानं गरिबांना उपचार घेताना अडचणी येत आहेत. त्यामुळे इंजेक्शनचं उत्पादन वाढवा, त्यावरील कर कमी करा, गरिबांना मोफत उपचार द्या, औषधांचा काळाबाजार रोखा, असे सल्ले व्यास यांनी सरकारला दिले आहेत. मृतांची संख्या वाढत आहे. दररोज जळणाऱ्या चिता चिंतेचं कारण ठरत आहेत. मृत्यूचं प्रमाण किती वाढलंय याची कल्पना स्मशानात दररोज येणारे मृतदेह पाहून येऊ शकेल. ज्यांनी आपली जवळची माणसं गमावली आहेत, त्यांना आयुष्याची किंमत माहीत आहे, अशा शब्दांत व्यास यांनी काळजाला हात घातला आहे.याआधी कधीच इतके मृत्यू पाहिले नाहीत'मी अंत्यविधीचं सामान विकतो. माझं एक दुकान आहे. मात्र आयुष्यात कधीच इतकी भयावह परिस्थिती पाहिली नाही. मला माझी आणि माझ्या कुटुंबाची चिंता सतावत आहे. राज्यातल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या स्मशानात गेल्यावरच कमी होत आहे,' असं व्यास यांनी त्यांच्या पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान