शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Cruise Drug Case: “समीर वानखेडेंवर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 17:05 IST

Mumbai Cruise Drug Case: देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली: मुंबई क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणावरून (Mumbai Cruise Drug Case) एकीकडे नवाब मलिक एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सातत्याने आरोप करताना पाहायला मिळत असून, दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. यातच साक्षीदार किंवा पंच असलेले प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर यांच्यासह पंच के पी गोसावी यांच्याबाबत केलेल्या २५ कोटींच्या डील प्रकरणावरुन एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत समीन वानखेडे यांना बाजूला ठेवावे, असे म्हटले जात आहे. यावर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

जे काही आरोप लागले आहेत त्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे आणि ती योग्य प्रकारे होईल. जर एनसीबीला तसे वाटले ही चौकशी होईपर्यंत त्यांना बाजूला ठेवले पाहिजे तर ते तसा निर्णय घेतील. त्यांना तसे वाटले नसेल. तसेच शेवटी ही स्ट्रॅटजीही असू शकते की एखाद्या अधिकाऱ्यावर सातत्याने आरोप करायचे जेणेकरुन त्या अधिकाऱ्याला चौकशीपासून बाजूला करता येईल. अशी पद्धत पाडणे योग्य नाही. आणि म्हणून प्रायमाफेसी केस असेल तर ते निर्णय घेतील. शेवटी यासंदर्भातील निर्णय करायला मी अधिकारी नाही आणि मला त्यात बोलण्याचा अधिकारही नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. 

संजय राऊत ड्रग्जवाल्यांची वकिली करतायत का

संजय राऊत ड्रग्जवाल्यांची वकिली करत आहेत का, अशी विचारणा करत मुंबई आणि महाराष्ट्राला ज्याप्रमाणे ड्रग्जचा विळखा पडला आहे, तरुणाई बर्बाद होतेय, त्याविरुद्ध लढायच्या ऐवजी संजय राऊतांसारखे लोकं त्यांना समर्थन देत असतील, तर आपण म्हणतो ना की, ईश्वरच मालक आहे, अशीच परिस्थिती निर्माण होईल. परंतु, मला त्यांना उत्तर द्यायची इच्छा  नाही. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. संजय राऊत यांचा उद्देश एवढाच आहे की, मूळ मुद्द्यांपासून सगळ्या गोष्टी, सगळे लक्ष भटकले पाहिजे. मूळ मुद्द्यांवर चर्चा होऊ नये, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.  

टॅग्स :Mumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSameer Wankhedeसमीर वानखेडे