शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
6
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
7
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
8
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
9
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
10
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
11
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
12
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
13
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
14
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
15
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
16
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
17
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
18
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
19
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

डिटेन्शन सेंटर : मृतांची संख्या २९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:18 IST

आसामातील घुसखोरांना डांबण्यासाठी उघडण्यात आलेल्या ताबा केंद्रात (डिटेन्शन सेंटर) आणखी एका व्यक्तीचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. त्याबरोबर ताबा केंद्रातील मृतांची संख्या आता २९ झाली आहे.

नवी दिल्ली : आसामातील घुसखोरांना डांबण्यासाठी उघडण्यात आलेल्या ताबा केंद्रात (डिटेन्शन सेंटर) आणखी एका व्यक्तीचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. त्याबरोबर ताबा केंद्रातील मृतांची संख्या आता २९ झाली आहे. ताबा केंद्रातील हा व्यक्ती आजारी पडला होता. त्यामुळे त्याला १० दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याच रुग्णालयात आॅक्टोबरमध्येही एका ६५ वर्षीय घुसखोराचा मृत्यू झाला होता.एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृताचे नाव दुलाल पॉल असे असून तो सोनीपूर जिल्ह्यातील अलिसिंगा गावचा रहिवासी होता. पॉल हा ११ आॅक्टोबर २०१७ पासून तेजपूरच्या ताबा केंद्रात होता. सूत्रांनी सांगितले की, आसामात सध्या सहा ताबा केंद्रे सुरू आहेत. तथापि, ही ताबा केंद्रे जिल्हा कारागृहातच तयार करण्यात आली आहेत. ताबा केंद्रांत सध्या १ हजार लोकांना ठेवण्यात आले आहे. सातवे ताबा केंद्र गोलपारा जिल्ह्यात स्थापन करण्यात येत आहे.शासकीय माहितीनुसार, आसामच्या विदेशी नागरिक लवादाने ‘बेकायदेशीर विदेशी व्यक्ती’ घोषित केलेल्या लोकांना ताबा केंद्रात ठेवण्यात आले आहे. मागील तीन वर्षांत ताबा केंद्रातील २८ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.>मंत्र्यांनी काय सांगितले?विधिमंडळ कामकाजमंत्री चंद्रमोहन पाटोवारी यांनी जुलैमध्ये राज्य विधानसभेत सांगितले होते की, आसामातील सहा ताबा केंद्रांत जुलैपर्यंत २५ जण मृत्युमुखी पडले आहेत. यातील फक्त दोन मृतांचा पत्ता बांगलादेशातील असून उरलेल्या सगळ्या मृतांचा पत्ता आसामातीलच आहे. मृतांपैकी कोणाचाही मृतदेह बांगलादेशात पाठविण्यात आलेला नाही.