शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देवबंदचे सर्व पासपोर्ट तपासणार, बांगलादेशचे अतिरेकी असल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:56 IST

पश्चिम उत्तर प्रदेशच्या देवबंदचा पट्टा आणि त्या पलीकडे दिल्या गेलेल्या पासपोर्टसची पुन्हा तपासणी पोलिस करणार आहेत. बांगलादेशच्या अतिरेक्यांनी या भागातून आणखी पासपोर्टस मिळवले आहेत का हे त्यांना तपासायचे आहे.

लखनौ : पश्चिम उत्तर प्रदेशच्या देवबंदचा पट्टा आणि त्या पलीकडे दिल्या गेलेल्या पासपोर्टसची पुन्हा तपासणी पोलिस करणार आहेत. बांगलादेशच्या अतिरेक्यांनी या भागातून आणखी पासपोर्टस मिळवले आहेत का हे त्यांना तपासायचे आहे.बांगलादेशातील अन्सारुल्लाह बांगला टीम या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेला संशयित अब्दुल्ला याला गेल्या आॅगस्ट महिन्यात मुजफ्फरनगर जिल्ह्यात अटक करण्यात आली. हा दहशतवादी गट अल कायदाकडून प्रेरणा घेतलेला आहे. अब्दुल्ला याने या भागातील पत्त्यावरील प्रवासाची कागदपत्रे सादर केल्याचे दहशतवादविरोधी तुकडीला आढळल्यानंतर देवबंद भागातील सगळ््याच पासपोर्टसची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अब्दुल्लाच्या झालेल्या चौकशीनंतर टाकलेल्या छाप्यांत बांगलादेशातील आणखी काही अतिरेक्यांना सहारनपूर जिल्ह्याच्या या भागातून पासपोर्ट दिले गेले असावेत, असा पोलिसांना संशय आहे.दारूल उलूम देवबंद हे इस्लामिक शिक्षणाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. धर्मनिरपेक्ष लिखाण करणाºयांवर व ब्लॉगर्सवर अनेक प्राणघातक हल्ले केल्याचा आरोप अन्सारुल्लाह बांगला टीमवर आहेत. २०१५ मध्ये या गटाने आंतरराष्ट्रीय ब्लॉगर्स आणि कार्यकर्त्यांची हिटलिस्ट प्रसिद्ध केली होती. त्यात नऊ जण इंग्लडमधील तर दोन अमेरिकेचे होते. सहारनपूर जिल्ह्यातून ज्यांनी पासपोर्ट मिळवला परंतु आता ते तेथे राहात नाहीत अशा लोकांची यादी आम्हाला करायची आहे, असे सहारनपूरचे पोलिस प्रमुख बबलू कुमार यांनी सांगितले.सात वर्षांपासून अनेक संशयित आढळलेअब्दुल्ला-अल-मेमन याला आॅगस्टमध्ये अटक करण्यात आली होती. चौकशीत मेमन २०११ पासून उत्तर प्रदेशात राहतो आहे. सुरवातीला तो देवबंद आणि नंतर मुजफ्फरनगरच्या कुटेसरा भागात राहायचा. फैजन याला अजून अटक झालेली नाही. तो या गटाचा प्रमुख असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. हा गट दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना मानसिकदृष्ट्या तयार करतो व त्यांना आवश्यक ते साह्य करतो. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अनेक दस्तावेजांत बाँब बनवण्याच्या सूचना आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :passportपासपोर्ट