शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसा येणार?; स्विस बँकेतील शेकडो खात्यांची माहिती लवकरच भारताला मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 11:14 IST

30 सप्टेंबरपर्यंत माहिती मिळणार

नवी दिल्ली: स्विस बँकेतील भारतीय खातेधारकांची माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे. भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या करारानुसार ३० सप्टेंबरच्या आधी खातेधारकांची माहिती भारताला मिळेल. भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये ऑटोमॅटिक इक्स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन (एईओआय) करार झाला आहे. जुलै २०१८ मध्ये झालेल्या याच करारानुसार स्विस बँकेतील भारतीय खातेधारकांची माहिती उपलब्ध होणार आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. आम्हाला अनेकदा भारताला माहिती पाठवावी लागेल, असं स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती कर कार्यालयानं सांगितलं. त्यामुळे स्विस बँकेतील भारतीय खातेधारकांची संख्या अतिशय जास्त असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. स्विस बँकेत २०१८ च्या आधीपासून खातं असलेल्या सगळ्या खातेधारकांची माहिती भारताला मिळणार आहे. स्वित्झर्लंडच्या अर्थ मंत्रालयानं आणि मध्यवर्ती कर कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, भारतासह एकूण ७३ देशांना स्विस बँकेतील खातेधारकांची माहिती दिली जाईल. या सर्व देशांसोबत स्वित्झर्लंड सरकारनं ऑटोमॅटिक इक्स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन करार केला आहे. स्विस बँकेतील खातेधारकांची माहिती संबंधित देशाला देण्यापूर्वी संसदीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते. भारतीय खातेधारकांच्याबाबत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याचं स्विस प्रशासनानं सांगितलं. त्यामुळे सप्टेंबरच्या अखेरपर्यंत शेकडो खातेधारकांची माहिती भारताला मिळेल. यामुळे भारत आणि स्वित्झर्लंडचे संबंध एका नव्या उंचीवर जाऊन पोहोचतील, असा विश्वास स्विस अर्थ मंत्रालयाच्या प्रवक्तांनी व्यक्त केला. स्विस सरकारकडून खातेधारकांची माहिती मिळणार असल्याच्या वृत्ताला दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील दुजोरा दिला. 

टॅग्स :Swiss Bankस्विस बँकblack moneyब्लॅक मनी