शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महसूल अधिकार्‍यांच्या बदल्या खेडकर निवासी उपजिल्हाधिकारी

By admin | Updated: September 15, 2015 18:48 IST

नाशिक : पाच महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या महसूल अधिकार्‍यांच्या अखेर बदल्या करण्यात आल्या असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांची नाशिकच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक : पाच महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या महसूल अधिकार्‍यांच्या अखेर बदल्या करण्यात आल्या असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांची नाशिकच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच होणार्‍या बदल्यांकडे महसूल यंत्रणेचे लक्ष लागून होते. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस होणार्‍या बदल्या यंदा पाच महिने लांबणीवर पडल्याने बदलीपात्र व बदलीच्छुक हवालदिल झाले होते, तर राज्यात जवळपास तीसहून अधिक उपजिल्हाधिकारी नेमणुकीविना बसून होते. अखेर सोमवारी रात्री यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले. नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांची धुळ्याच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारीपदी बदली झाली, तर निवासी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) नीलेश जाधव यांची कळवणचे प्रांत अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. जाधव यांच्या जागी मुंबईहून नितीन मुंडावरे यांची बदली झाली आहे. नाशिकच्या भूसंपादन अधिकार्‍यांच्या रिक्त असलेल्या जागांवरही नवीन नेमणुका करण्यात आल्या असून, त्यात धुळ्याचे प्रांत अधिकारी विठ्ठल सोनवणे, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले उपजिल्हाधिकारी रमेश काळे, श्रीमती सुरेखा चव्हाण यांचा समावेश आहे. खेडकर यांच्या जागी धुळ्याच्या विशेष भूसंपादन अधिकारी श्रीमती हेमांगी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांची नाशिकला मुद्रांक उपमहानिरीक्षक या जागेवर बदली करण्यात आली आहे.
बदली झालेल्या सर्व अधिकार्‍यांना नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा पार पडल्यानंतरच कार्यमुक्ती देण्यात याव्यात, अशा सूचनाही शासनाने विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या आहेत.