शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्त करणार चौकशी?

By admin | Updated: April 27, 2016 00:16 IST

आदिवासी विकास भरती घोटाळा प्रकरण : मंत्री-सचिवांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक

आदिवासी विकास भरती घोटाळा प्रकरण : मंत्री-सचिवांच्या उपस्थितीत बुधवारी बैठकनाशिक : आदिवासी विकास महामंडळ व शबरी विकास महामंडळातील कथित भरती घोटाळा प्रकरणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना चौकशी करण्यासाठी नियुक्ती केल्याचे वृत्त आहे. मंगळवारी (दि.२६) रात्री उशिरा नाशकात आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा व प्रधानसचिव राजगोपाल देवरा हे येणार असल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात रात्री उशिरापर्यंत ते नाशिकमध्ये दाखल झालेले नव्हते. दोन दिवसांपूर्वीच आदिवासी विकास महामंडळ व शबरी विकास महामंडळातील नोकर भरतीच्या कथित घोटाळ्याप्रकरणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी भरती घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली होती. आदिवासी व शबरी विकास महामंडळांतर्गत ५८४ पदांसाठी झालेल्या नोेकर भरतीत ३०० कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, या नोकर भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आदिवासी विकास विभागाला दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नियुक्त करण्यात आली होती. मंगळवारी याप्रकरणाला कलाटणी मिळाली असून, आता या भरती घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांना आदेश देण्यात आल्याचे कळते. विशेष म्हणजे शुक्रवारी (दि.२२) रात्री अचानक आदिवासी विकास विभागात आग लागून त्यात काही संगणक जळाले. भरती घोटाळ्यातील चौकशी सुरू होण्यापूर्वीच हे जळीतकांड घडल्याने त्याचा भरती घोटाळ्याशी संबंध असून, तो पुरावा नष्ट करण्याचाच एक भाग असल्याचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दुसर्‍या दिवशी या जळीतकांडाची पाहणी करताना आरोप केला होता. (प्रतिनिधी)