शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"मी जिवंत आहे..."; वडिलांना मृत दाखवून मुलांनी आपल्या नावावर केली कोट्यवधींची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 10:49 IST

आपल्या वडिलांना कागदावर मृत दाखवून मुलांनी त्यांची कोट्यवधींची संपत्ती आपल्या नावावर करून घेतली.

वडील-मुलांच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये समोर आली आहे. आपल्या वडिलांना कागदावर मृत दाखवून मुलांनी त्यांची कोट्यवधींची संपत्ती आपल्या नावावर करून घेतली. वडिलांना याची माहिती मिळताच ते एसडीएमकडे तक्रार घेऊन गेले. मात्र त्यांचं कुठेही ऐकलं जात नसल्याचं म्हणणे आहे. न्याय मिळावा म्हणून ते सर्वत्र फिरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिश्चंद यादव हे अहलादपूर मरकडी गावचे रहिवासी आहेत. त्यांना विजय यादव, मनोज यादव आणि अमित यादव अशी तीन मुलं आहेत. यापैकी अमितचा मृत्यू झाला आहे. हरिश्चंद यांनी पत्नी पानमतीच्या नावे जमीन खरेदी केली होती. त्यांनी एक इंटर कॉलेज देखील बांधलं, ज्याचे ते स्वतः व्यवस्थापक होते आणि नंतर त्यांनी आपल्या मुलाला व्यवस्थापक केलं.

हरिश्चंद यांच्या मालमत्तेची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. हरिश्चंद यांच्या पत्नी पानमती यांचे जून 2023 मध्ये निधन झाले. यानंतर त्यांची दोन मुलं मनोज यादव आणि विजय यादव यांनी कागदोपत्री फेरफार करून संपूर्ण जमिनीचा वारसा त्यांच्या नावे करून घेतला. त्यांचं नाव काढून टाकून कै. हरिश्चंद्र यादव असं लिहिलं असून सर्व मालमत्ता त्यांच्या मुलांच्या नावावर नोंदवण्यात आली आहे.

हरिश्चंद यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांना धक्का बसला. ते म्हणतात की, त्यांची मुलं कधीही त्यांना मारू शकतात. त्यांचं एक इंटर कॉलेज आहे, ज्यामध्ये त्यांच्या मुलाला मॅनेजर बनवण्यात आलं. आता मी तिथे गेलो तर मला पोलिसांच्या ताब्यात देईन, अशी धमकी देत ​​आहेत. त्यांनी रुद्रपूर तहसीलमधील एसडीएमची भेट घेतली असता त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही.

हरिश्चंद यादव यांनी सांगितलं की, मी सर्व मालमत्ता माझ्या पत्नीच्या नावावर खरेदी केली होती. 2023 मध्ये पत्नीचा मृत्यू झाला. आता षड्यंत्राचा एक भाग म्हणून पुत्रांनी सर्व संपत्ती आपल्या नावावर केली आहे. पेपरमध्ये आम्हाला मृत दाखवण्यात आले आहे. मला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. माझा मुलगा मला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे. तसेच सर्व कागदपत्रांवर मला मृत दाखवण्यात आलं आहे.