शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भारताला दूषणे देणारेच अणुइंधन नाकारतात

By admin | Updated: April 7, 2015 03:56 IST

हवामान बदलाच्या मुद्यावर भारताची उपलब्धी व प्रयत्नांविरोधात गळा काढणाऱ्या विकसित देशांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी खरमरीत टीका केली

नवी दिल्ली : हवामान बदलाच्या मुद्यावर भारताची उपलब्धी व प्रयत्नांविरोधात गळा काढणाऱ्या विकसित देशांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी खरमरीत टीका केली. भारताला ‘सल्ला’ देणारे देशच स्वच्छ ऊर्जेसाठी अणुइंधन देण्यास नकार देतात, अशा शब्दांत मोदींनी विकसित देशांच्या मनोवृत्तीवर ताशेरे ओढले.भारत अणुऊर्जेसह स्वच्छ ऊर्जेच्या वापरासाठी कटिबद्ध आहे, यावर जोर देत अणुइंधन आयात करण्याबाबत भारतावरील प्रतिबंध शिथिल करावे, असे मोदी म्हणाले. विविध राज्यांचे पर्यावरण मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या एका संमेलनात मोदी बोलत होते. जग वाढत्या हवामान बदलामुळे चिंतित आहे व भारत या मार्गात अडचणी निर्माण करीत आहे, अशा चुकीच्या पद्धतीने भारताकडे पाहिले जात आहे. आमच्या देशात निसर्गाची परमेश्वर म्हणून पूजा केली जाते व म्हणून हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत भारताला जागतिक नेतृत्व म्हणून समोर आले पाहिजे, असे मोदी यावेळी म्हणाले.विरोधकांकडून दिशाभूलवादग्रस्त भू संपादन विधेयकाच्या मुद्यावर वादळ उठले असतानाच, आदिवासी व वन जमिनीबाबत विरोधक लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मोदी यांनी केला.(लोकमत न्यूज नेटवर्क)