शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा विषाणू पहिल्यापेक्षा अधिक शक्तिशाली; शास्त्रज्ञ म्हणतात, विनाविलंब लस हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 08:44 IST

लोकांना कधी कधी एका सेरोटाइपने संसर्ग होऊ शकतो आणि नंतर वेगळ्या सेरोटाइपचा दुय्यम संसर्ग होऊ शकतो.

बंगळुरू : कोरोनाशी लढाई सुरू असतानाच अनेक जुने रोगही उचल खात आहेत. त्यातच आता भारतातील डेंग्यू विषाणू प्रचंड प्रमाणात विकसित झाल्याचे येथील भारतीय विज्ञान संस्थेच्या (आयआयएससी) संशोधकांनी उघड केल्यामुळे खळबळ उडाली आहे. सहा दशकांतील विषाणूतील संगणकीय विश्लेषणाचा भाग म्हणून नवीन तपशील उघड करण्यात आले आहेत.

अभ्यासात आढळून आले की, डासांमुळे होणाऱ्या या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण गेल्या ५० वर्षांमध्ये, प्रामुख्याने दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये सातत्याने वाढत गेले आहेत. इतर देशांमध्ये डेंग्यूवर लस विकसित केल्या गेल्या आहेत; परंतु भारताकडे डेंग्यू विरुद्ध मान्यताप्राप्त लस नाही.  

आयआयएससीचे रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक राहुल रॉय, ‘आम्ही डेंग्यूचे भारतातील वेगवेगळ्या रूपांबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. आम्हाला आढळले की, ते लस विकसित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मूळ प्रकारांपेक्षा खूप वेगळे आहेत. डेंग्यू विषाणूच्या (डेंग्यू १, २, ३ आणि ४) चार व्यापक सेरोटाइप आहेत. संगणकीय विश्लेषणाचा वापर करून, संशोधकांच्या पथकाने तपासले असता त्यांना आढळले की त्यांची रचना खूप गुंतागुंतीची झाली आहे.’

एकाच वेळी संसर्गाने गंभीर परिस्थितीलोकांना कधी कधी एका सेरोटाइपने संसर्ग होऊ शकतो आणि नंतर वेगळ्या सेरोटाइपचा दुय्यम संसर्ग होऊ शकतो, ज्यामुळे अधिक गंभीर लक्षणे उद्भवू शकतात, असे आयआयएससीचे संशोधक विद्यार्थी सूरज जगताप म्हणतात.

डेंग्यू-२ देशभरात प्रबळ

२०१२ पर्यंत, भारतात डेंग्यू-१ आणि डेंग्यू-३ हे प्रमुख प्रकार होते. अलीकडच्या वर्षांत, संशोधकांना असे आढळून आले आहे की डेंग्यू-२ संपूर्ण देशभरात अधिक प्रबळ झाला आहे, तर डेंग्यू-४, जो एकेकाळी सर्वांत कमी संसर्गजन्य मानला जात होता, तो आता दक्षिण भारतात जोर धरत आहे. विशिष्ट कालावधीत विषाणूचे विशिष्ट स्वरूप प्रबळ करणारे कोणते घटक आहेत, हे शोधण्याचा संशोधक प्रयत्न करत आहेत. एक संभाव्य घटक प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) आधारित वाढ (एडीई) असू शकतो.

टॅग्स :dengueडेंग्यू