शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात डेंग्यूचा फैलाव ! ..जोड आहे...

By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST

मनपा सुस्त : उपाययोजना सोडून जनजागृतीवर लक्ष नागपूर : मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने डासांचा प्रकोप वाढला आहे. शहराच्या सर्वच भागात डेंग्यू व मलेरियाची लक्षणे असलेले रु ग्ण आढळून येत आहे. गेल्या १५ दिवसात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने या रोगाचा शहरात फैलाव होत असल्याचे स्पष्ट ...


मनपा सुस्त : उपाययोजना सोडून जनजागृतीवर लक्ष
नागपूर : मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने डासांचा प्रकोप वाढला आहे. शहराच्या सर्वच भागात डेंग्यू व मलेरियाची लक्षणे असलेले रु ग्ण आढळून येत आहे. गेल्या १५ दिवसात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने या रोगाचा शहरात फैलाव होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात डेंग्यूचे संशयित रु ग्ण आढळून येत असतानाच जुलै महिन्यात शहरात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याचा दावा मनपाच्या मलेरिया व फायलेरिया विभागाने केला आहे. वास्तविक डेंग्यूची चाहूल लागल्याने मनपा प्रशासनाने मे महिन्यात जनजागृती अभियान हाती घेतले होते. या आजाराची लक्षणे व त्यापासून संरक्षण करण्यासाठी घ्यावयाची खरदारी या विषयी लोकांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने डेंग्यूच्या उत्पत्तीला संजीवनी मिळाली आहे.
गेल्या दोन आठवड्यात डेंग्यूच्या संशयित रुग्णांच्या संंख्येत वाढ झाल्याची माहिती सदर येथील एका पॅथॉलॉजी संचालकाने दिली. शहराच्या उत्तर व दक्षिण भागातील अविकसित ले-आऊ टमध्ये टिकठिकाणी खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी मनपाच्या आरोग्य विभागामार्फत एमएल ऑईलची फवारणी केली जाते. परंतु यामुळे डासांना आळा बसत नाही. वातावरण दमट असल्याने फॉगिंगचाही उपयोग होत नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाचा जनजागृतीवर भर असल्याचे चित्र आहे.
मनपाकडे नोंद असलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षात शहरात ४००० लोकांना डेंग्यूचा आजार झाला होता. वास्तविक या रुग्णांची संख्या दुप्पट होती. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूला सुरुवात झाली होती. यावर्षी मात्र जुलै महिन्यातच या आजाराने डोके वर काढले आहे.
चौकट..
अद्याप रुग्ण आढळला नाही
डेंग्यू व मलेरिया संदर्भात जनजागृती करण्यासाठी शाळा, उद्यान तसेच प्रभाग स्तरावर कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे . जुलै महिन्यात अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
जयश्री धोटे
मलेरिया-फायलेरिया अधिकारी,मनपा.