नाशिक : फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि कायद्याचे राज्य चालवावे याकरिता राष्ट्रीय फेरीवाला संघटनेच्या वतीने महापालिकेच्या राजीव गांधी भवनसमोर निदर्शने करण्यात आली. पालिकेत शहर फेरीवाला समितीची बैठक सुरू असतानाच फेरीवाल्यांनी ही निदर्शने केली.महापालिकेच्या प्रवेशद्वारावर संघटनेचे संस्थापक अशोक सानप यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. विभागीय प्रभात फेरीवाला समितीची स्थापना करण्यात यावी, शहर फेरीवाला समिती सदस्यांचे रोखलेले मानधन त्वरित अदा करावे, सिंहस्थापूर्वी फेरीवाला व्यवसाय परवाना तसेच फेरीवाला क्षेत्र निश्चित करावे, राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ च्या कायद्यानुसार शहर फेरीवाला समितीला पालिका कार्यालयात कक्ष व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, पश्चिम विभागातील शिवाजीरोड येथे वेळेचे फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात यावे, राष्ट्रीय कायद्याच्या तरतुदीनुसार दंडाची रक्कम आकारून जप्त करण्यात आलेल्या टपर्या, साहित्य परत करावे, पोलिसांचा हस्तक्षेप थांबवावा, सर्वेक्षण व नोंदणी अहवाल बैठकीत खुला करावा आदिंसह विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर फेरीवाल्यांनी राजीव गांधी भवनच्या पायर्यांवर ठाण मांडत घोषणाबाजी केली. या आंदोलनात कंपा माने, राजेंद्र बागुल, राजेंद्र शेलार, दिलीप संधान, श्रीवर्धन तांबट, औरंगाबादकर, दत्तात्रेय तळेकर, सचिन कोकाटे, गणेश चांगटे, प्रवीण शिंदे, किरण ठाकूर आदिंसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फेरीवाला संघटनेची पालिकेसमोर निदर्शने
By admin | Updated: January 6, 2015 00:04 IST