शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीमध्ये हिंसक धमक्या देणे अयोग्य ! उपराष्ट्रपतींनी पद्मावती प्रकरणी विरोधकांना सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 06:23 IST

हिंसक धमक्या देणे आणि कुणाला शारीरिक नुकसान पोहोचविण्यासाठी बक्षीस जाहीर करणे, असे प्रकार लोकशाहीत स्वीकारार्ह नाहीत, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

लोकशाहीमध्ये हिंसक धमक्या देणे अयोग्य ! उपराष्ट्रपतींनी पद्मावती प्रकरणी विरोधकांना सुनावलेनवी दिल्ली : हिंसक धमक्या देणे आणि कुणाला शारीरिक नुकसान पोहोचविण्यासाठी बक्षीस जाहीर करणे, असे प्रकार लोकशाहीत स्वीकारार्ह नाहीत, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.‘पद्मावती’ चित्रपटाचा उल्लेख न करता व्यंकय्या नायडू यांनी कायद्याचे उल्लंघन करू पाहणा-यांना इशारा दिला. एका साहित्य महोत्सवात व्यंकय्या नायडू म्हणाले की, काही चित्रपटांवरून समस्या निर्माण झाली आहे. काही लोकांना असे वाटते की, त्यांचा धर्म आणि समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.मात्र अशा आंदोलनाच्या काळात काही लोक अतिरेकच करतात आणि बक्षिसांच्या घोषणा करतात. या लोकांकडे एवढा पैसा आहे की नाही याबाबत मला संशय आहे. सर्वच जण एक कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करत आहेत. एक कोटी रुपये असणे सोपे आहे काय? मुळात लोकशाहीत हिंसाचाराला चिथावणी देणाºया धमक्यांना स्थानच असता कामा नये. लोकशाही पद्धतीने विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.पद्मावती चित्रपटावरून वाद सुरूअसतानाच काही नेत्यांनी संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिकापदुकोन यांचा शिरच्छेद करणाºयास इनाम देण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर नायडू यांच्या विधानाकडे पाहिले जात आहे. नायडू म्हणाले की, कायदा हातात घेण्याचा आपल्याला अधिकार नाही, तसेच दुसºयांच्या भावना दुखावण्याचाही अधिकार नाही.आता ममतांना धमकीसंजय लीला भन्साळी आणि दीपिका पदुकोन यांचा शिरच्छेद करण्यासाठी इनाम घोषित केल्यानंतर भाजपा नेते सूरज पाल अमू यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही धमकावले आहे.बॅनर्जी यांनी भन्साळी व दीपिका यांना पाठिंबा दिल्यानंतर सूरज पाल अमू म्हणाले की, लक्ष्मणाने शूर्पणखेच्या बाबतीत काय केले होते ते ममता बॅनर्जी यांना सांगण्याची मला गरज वाटत नाही. लक्ष्मणाने शूर्पनखेचे नाक कापल्याचे संदर्भ रामायणात आहेत.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू