शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

अमरनाथ यात्रेकरूंची संख्या कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 01:31 IST

दरवर्षी वाढत जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंची संख्या कमी करण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे. अशी मागणी करणारे केवळ फुटीरवादी गटच नव्हे तर प्रदूषण नियंत्रण मंडळही यात

- सुरेश एस. डुग्गर, श्रीनगर

दरवर्षी वाढत जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंची संख्या कमी करण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे. अशी मागणी करणारे केवळ फुटीरवादी गटच नव्हे तर प्रदूषण नियंत्रण मंडळही यात पुढे आहे. परंतु संख्या कमी झाल्यास काश्मीरच्या पर्यटन उद्योगावर परिणाम होणार आहे. गेल्या दहा वर्षांतील आकड्यांवर नजर टाकली तर अमरनाथ यात्रा आजही काश्मीरच्या पर्यटनासाठी पाठीच्या कण्याइतकीच महत्वाची बनली असल्याचे दिसते. परंतु ही वस्तुस्थिती पर्यावरणाची पट्टी डोळ््यांवर बांधलेले फुटीरवादी नेते मान्य करायला तयार नाहीत. काश्मीरच्या पर्यटनाशी संबंधितांचे म्हणणे असे आहे की अमरनाथ यात्रा ही काश्मीरच्या पर्यटनाची जणू श्वास बनली आहे. अशा पार्श्वभूमीवर अहसान फाजिलींसारख्या कितीतरी काश्मिरींना असे वाटते की ही यात्रा वर्षभर सुरू राहील अशी व्यवस्था झाली पाहिजे. ते फुटीरवाद्यांच्या मोहिमेशी सहमत नव्हते. आकड्यांचा आधार घेत काश्मीरच्या पर्यटनाचा विचार केला तर गेल्या वर्षी काश्मीरला आलेल्या एकूण १५ लाख पर्यटकांमध्ये ३.७५ लाख अमरनाथ यात्रेकरू होते. २००४ पासून २००९ पर्यंत काश्मीरमध्ये 51,00,000पर्यटक आले. त्यातील २१.३८ लाख पर्यटक अमरनाथ यात्रेकरू होते. हे यात्रेकरू पर्यटक म्हणूनही काश्मीरमध्येही फिरले होते. संख्येवर आक्षेप का?- यात्रा लांबविल्यामुळे पहाडी भागात प्रदूषण वाढत आहे.लिद्दर दरीतील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. - बैसरन तथा सरबलचे जंगल अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. पहाड आणि वाहत्या दऱ्यांचा समतोल व पर्यावरण व्यवस्था बिघडली आहे. - यात्रेत अधिक संख्येने लोकांना सहभागी होण्यास परवानगी देऊन आर्थिकदृष्ट्या काही संघटना बळकट होत आहेत.- या संस्था पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी काहीही करीत नाहीत, असे अहवालात म्हटले आहे.