शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देशभर अभ्यासक्रमात तामिळ भाषा वैकल्पिक करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 03:38 IST

मुख्यमंत्र्यांचे ट्विट : पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती

नवी दिल्ली : संपूर्ण भारतात अभ्यासक्रमात तामिळ भाषेचा समावेश वैकल्पिक म्हणून करण्याची मागणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तीन भाषा सूत्रांनुसार हिंदी भाषेवरून तामिळनाडूत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पलानीस्वामी यांनी ही मागणी ट्विटरद्वारे केली आहे.

‘आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विनंती की, त्यांनी इतर राज्यांत तमिळ भाषेचा समावेश वैकल्पिक भाषा म्हणून करावा. तसे झाल्यास जगातील सर्वात पुरातन अशा भाषेची मोठीच सेवा होईल.’ नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात अहिंदी भाषिक राज्यांत शाळांमध्ये हिंदी शिकणे सक्तीचे करणारी आणि हिंदी भाषेचा उल्लेख न करता त्रिभाषा सूत्राची शिफारस करण्यात आली होती. तामिळनाडूच्या विरोधानंतर हे धोरण केंद्र सरकारला बदलून घेणे भाग पडले. तथापि, केंद्र सरकारने हे धोरण म्हणजे बदल करता येईल, असा मसुदा होते, असे सांगून कोणतीही भाषा लादली जाणार नाही, असे आश्वासन दिले. तमिळ भाषा ही तमिळनाडू, पाँडेचेरी आणि अंदमान बेटांची अधिकृत भाषा आहे हे महत्वाचे. तमिळ भाषा ही २०१० पर्यंत हरियानाची दुसरी अधिकृत भाषा होती. ही भाषा खूप जुन्या भाषांपैकी असून ती काही कोटी लोक बोलतात. कॅनडा, अमेरिका, दक्षिण अफ्रिका आणि इतर देशांत तमिळ ही अल्पसंख्य भाषा म्हणून स्वीकारली गेलेली आहे.

भाषा लादू देणार नाहीराष्ट्रीय शिक्षण धोरण, २०१९ च्या मसुद्यात अहिंदी भाषक राज्यांत हिंदी व इंग्रजीसह मातृभाषा अशा तीन भाषांच्या सूत्राची, तर हिंदी भाषक राज्यांत इंग्रजी आणि देशाच्या इतर भागांतून एक भारतीय भाषा अशी शिफारस करण्यात आली आहे. तामिळनाडू, कर्नाटक आदी अहिंदी भाषक राज्यांतील अनेक नेत्यांनी या धोरणाला विरोध केलेला आहे. तामिळनाडू राज्यात सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आम्ही तिसरी भाषा आमच्यावर लादू देणार नाही, असे स्पष्ट केले. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केंद्र सरकार कोणत्याही भाषेची सक्ती करू शकत नाही, असे म्हटले.